सोलापूर : कर्नाटक राज्यातील विजापूर होऊन सोलापूरकडे येत असताना कारची कवठे गावाजवळील ब्रिजला धडक होऊन आतील चार तरुण जागीच ठार झाले. आज बुधवारी (ता. 5) पहाटे चार वाजताच्या सुमारास विजापूर रोडवर ( Bijapur Road) हा भीषण अपघात झाला आहे.
पाचजण सिंदगी ते पुणे जात होते. कवठा बायपास हायवे ब्रिजला गाडी जाऊन धडक दिल्याने हा अपघात झाला व त्यात चारजण ठार झाले व एक जखमी आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयात (government hospital) जखमीवर उपचार सुरू आहेत.
महामार्गावरील ब्रीजला ( कारची जोराची धडक बसून चौघांचा मृत्यू ( Four young men killed) झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे. अरुण कुमार लक्ष्मण (वय 21), महिबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18), फिरोज सैफसाब शेख (वय 20), मुन्ना केंभावे (वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, तालुका सिंदगी, जि. विजयपूर, vijaypur राज्य – कर्नाटक karnataka) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी हे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास कारमध्ये (car) बसून विजयपूर ते सोलापूर (solapur) नवीन महामार्गावरून सोलापूरकडे येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजयपूर महामार्गावरील नवीन कवठे बायपास हायबे ब्रीजला कारची धडक बसून झालेल्या अपघातात (accident) कारमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. त्यातील चौघे ठार झाले व एक गंभीर जखमी आहे.
पाचजण सिंदगी (Sindagi) ते पुणे (Pune) जात होते. कवठा बायपास हायवे ब्रिजला गाडी जाऊन धडक दिल्याने हा अपघात झाला व त्यात चारजण ठार झाले व एक जखमी आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच सलगर वस्ती (salgar wasti police) पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आर. ए. जाधव यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. चौघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टर रोहित पाटील यांनी सांगितले. या घटनेची नाेंद सिव्हिल (civil police chouki) पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.