मुंबई : मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन चोरुन Bully bai ॲपवर अपलोड करुन त्यांची बोली लावण्याचं घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांना पकडलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी उत्तराखंड येथील एका महिलेला अटक केली आहे. तीच या प्रकरणात मास्टरमाईंड (mastermind) असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच मुंबईच्या सायबर पोलिसांनी एका 21 वर्षीय आरोपीला थेट बंगळुरुमध्ये अटक केली आहे.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात बुल्ली बाई ॲपचं (app) प्रकरण मोठ्या प्रमाणात रंगत आहे. या प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून 21 वर्षीय इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.
या इंजिनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव विशाल झा असं आहे. विशाल कुमार झा या आरोपीला मुंबई सायबल सेलच्या पोलिसांनी काल मंगळवारी अटक केली आहे. परंतु बंगळुरूनंतर आता उत्तराखंडमधून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड (upload) करून त्यांची बोली लावून त्यांना बदनाम करण्याचं काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, मुंबई सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन दिवसांमध्येच या आरोपींना शोधून काढलं आहे. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) आणि राजकीय (political) वतुर्ळात देखील बुली बाई प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. बुली बाई अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून आक्षेपार्ह भाषेत मजकूर टाकल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला होता. एका मुस्लीम महिला पत्रकाराचे फोटो (phto) देखील अशाच प्रकारे अपलोड झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये मुस्लिम महिलांचे फोटो लिलावासाठी ॲपवर अपलोड करण्यात आले होते. उत्तराखंडमधून ट्रान्झिट रिमांडसाठी महिलेला तपासासाठी मुंबईत आणण्यात आले आहे.
इंटरनेटवर बुल्लीडील ॲप उघडून करून मुस्लिम महिलांची विक्री करणाऱ्या माणसाला मुंबई पोलिसांनी दोन दिवसात अटक केली. सुल्लीडीलमार्फत हेच घाण काम करणाऱ्याला दिल्ली पोलीस सहा महिने (six months) शोधतायत. हा कार्यक्षमतेतील फरक आहे, अशी ट्विट (tweet) राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांना पहिलं यश आलं असल्याचं ट्विट राज्याचे गृहराज्यमंत्री (homeminister) सतेज पाटील यांनी केलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तिची ओळख जाहीर केल्यास प्रकरणाच्या चौकशीला बाधा येऊ शकते, असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे.