मुंबई : राज्यातील विद्यापीठ (University), महाविद्यालयातील (colleges) परीक्षा (exam) या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन (online) घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री (education minister) उदय सामंत यांनी दिली आहे. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे. परीक्षांमध्ये अडचणी (Difficulties) येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन (helpline) नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण (corona pationt) संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद (close) ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती (information) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची घोषणाही (declared) त्यांनी केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ (big increases) होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय अनेक महानगरपालिकांनी घेतला असतानाच आता राज्यातील ( state) महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत ( February 15) बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामंत (samant) यांनी जाहीर केले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कालच सामंत यांनी सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक (meeting) घेतली. कोरोनासंदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येवून विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षिततेबद्दल चर्चा केली. नंतर महाविद्यालयांबाबत आज निर्णय जाहीर करण्यात आला.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. यामध्ये विजेची गैरसोय किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय कोविडबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा (re-examination) देण्याची संधी (opportunities) देण्यात यावी.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरु करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इ. विद्यापीठानी त्यांच्या संकेतस्थळावर (on the website) माहिती उपलब्ध करून द्यावे. सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना व कालावधी देऊन ही वसतिगृह (hostel) बंद करण्यात यावेत. यामध्ये परदेशी विद्यार्थी व संशोधन करीत असलेली पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतीगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे अनेक आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.
महाविद्यालयांशी निगडीक वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन संबंधित वसतीगृहे देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी. मात्र परदेशातून ( From abroad) महाराष्ट्रात जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांची वसतिगृहाची सुविधा ( Convenience) बंद करण्यात येऊ नये, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.