मुंबई : राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यातच आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक ( Shocking) माहिती दिली. काही दिवसापूर्वी 20 आमदार (mla), 10 मंत्री (ministers) कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता ही संख्या वाढत आहे. आता 70 आमदार, 13 मंत्र्यांना कोरोनाची (corona) लागण झाली आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. राज्यात अधिक प्रमाणात नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने चिंता (Anxiety) व्यक्त करण्यात येत आहे.
मागील आठवड्यात हिवाळी अधिवेशन पार पडले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि आमदार बाधित झाले. याशिवाय अनेक आजी-माजी खासदार, नेत्यांना संसर्ग झालेला आहे. हिवाळी अधिवेशनात हे सर्व मंत्री, आमदार एकत्रच होते. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क आलेला होता. सध्या लग्नसराईचा ( Wedding inn) काळ असल्याने अनेक मंत्री, आमदार लग्नसमारंभाला हजेरी लावत आहेत.
मंत्री आणि अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने आजची बुधवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक (weekly) बैठक (meeting) रद्द करण्यात आली आहे. दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. कोरोनाची साथ आल्यापासून मंत्रिमंडळ ( Cabinet) बैठकीचे ठिकाण मंत्रालयाऐवजी सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले.
आतापर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींना कोरोना संसर्ग झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, राजन विचारे तसेच आमदार सागर मेघे, राधाकृष्ण विखे पाटील, इंद्रनील नाईक, नीलय नाईक, माधुरी मिसाळ, रोहित पवार, प्रताप सरनाईक आदींना कोरोनाची बाधा झाली आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मंत्रिमंडळ बैठकीदिवशी बहुतांश आमदार आपापल्या मतदारसंघांतील कामे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात ( Ministry) येत असतात. बर्याच नेते, लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना रूग्णांची आकडेवारी अशीच वाढत राहिली तर राज्यात कडक निर्बंध ( Strict restrictions) लावावे लागतील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात 20 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. दुसऱ्या लाटेत ही संख्या 40 लाखांवर पोहोचली होती. दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर राज्यातील जवळपास 80 लाख लोकांना कोरोनाची बाधा होईल अशी भीती (fear) मंत्री टोपे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईसह (mumbai) महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज आढावा घेतला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. या संदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवी. सध्या राज्य सरकारचे (state government) काम संथ गतीने सुरू आहे. तसेच सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
राज्यात काल मंगळवारी (4 जानेवारी) तब्बल 18 हजार 466 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 4558 रुग्ण कोरोनामुक्त (corona free) झाले आहे. तर 20 जणांचा मृत्यू (death) झाला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. तसेच, राज्यात आज 75 ओमायक्रॉनबाधित (Omicron) रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 653 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.