Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा

Surajya Digital by Surajya Digital
January 7, 2022
in Hot News, गुन्हेगारी, महाराष्ट्र, शिवार
1
16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : नाशिकमध्ये (nashik) 16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांची फसवणूक  (froud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक ( म्हणजे त्यांनी शासनालाही 6 वर्षांत सुमारे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी एका शेतकऱ्याने न्यायालयात (court) धाव घेतली आणि या संपूर्ण घोटाळ्याचे पुरावे सादर केले. तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पोलिसांना (police) तपास (Investigation) करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकच्या पेठ तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांनीच 147 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 50 कोटींहून अधिकचा हा घोटाळा (Scam) असल्याचा संशय (Doubt) आहे.

या प्रकरणी 16 कृषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. आरोप असलेले अनेक अधिकारी आता सेवानिवृत्त (Retired) आहेत. कंत्राटदार शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पेठ  (peth) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic crimes)  वर्ग करण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी म्हटलं आहे की, स्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार कृषी विभागाकडून (Department of Agriculture) 50 कोटींची फसवणूक झाली आहे. बोगस कागदपत्रे तयार करून कामे दाखवण्यात आले आहेत. यामधील कालावधी 2017 पर्यंत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांनी सांगितलं की, या प्रकरणात सध्या 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

तपासात जशी माहिती समोर येईल तशी कारवाई करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे ते कृषी खात्याशी निगडीत आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून ट्रॅक्टर ( Tractor) घेण्यात आले. मात्र बोगस कामकाज करून त्यांना मोबदला ( Compensation) देण्यात आला नाही. कामे न करताच आणि मोबदला न देता कामे दाखविण्यात आली आहे. यात इतरांची देखील फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि आकडाही वाढू शकतो, असं देखील सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.

भ्रष्टाचार ( Corruption) झाल्याचा अर्ज पेठ तालुक्यातील हेदपाडा एकदरे येथील शेतकरी योगेश सापटे यांनी पेठच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने पेठ पोलीस ठाण्याला याबाबत तपास करण्याचा आदेश (order) दिल्याने 5 जानेवारी 2022 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ( Complainant) यांच्या म्हणण्यानुसार काम न करताच बिल काढण्यात आली आहे. अशी तक्रार पुढे आली आहे. याप्रकरणी अजून कोणाची फसवणूक झाल्याचे नाकारता येत नाही. म्हणून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक (Superintendent) सचिन पाटील यांनी दिली आहे.

□ गुन्हा दाखल झालेल्या कृषी अधिका-यांचे नाव

१. नरेश शांताराम पवार, कृषी सहाय्यक, शिंदखेडा, धुळे
२. दगडू धारू पाटील, कृषी सहाय्यक, शहादा, नंदुरबार
३. संजय शामराव पाटील, कृषी सहाय्यक, धुळे
४. विठ्ठल उत्तम रंधे, कृषी सहाय्यक, एरंडगाव, येवला
५. दिपक पिराजी कुसळकर, कृषी सहाय्यक, अहमदनगर
६. दिलीप ज्ञानदेव फुलपगार, कृषी सहाय्यक, शिरूर पुणे
७. दिलीप औदुंबर वाघचौरे, कृषी पर्यवेक्षक, सोलापूर
८. मुकुंद कारभारी चौधरी, कृषी पर्यवेक्षक, राहुरी अहमदनगर
९. किरण सीताराम कडलग, कृषी पर्यवेक्षक, संगमनेर
१०. प्रतिभा यादवराव माघार, कृषी सहाय्यक, दिंडोरी नाशिक
११. राधा चिंतामण सहारे, कृषी सहाय्यक, सुरगाणा
१२. विश्वनाथ बाजीराव पाटील, मंडळ कृषी अधिकारी, पाचोरा जळगाव
१३. अशोक नारायण घरटे, मंडळ कृषी अधिकारी, साक्री धुळे
१४. एम बी महाजन, कृषी अधिकारी, पेठ
१५. सरदारसिंह उमेदसिंह राजपूत, तालुका कृषी अधिकारी, पाचोरा जळगाव
१६. शिलानाथ जगनाथ पवार, तालुका कृषी अधिकारी, कळवण नाशिक

Tags: #16Agriculturr #Officers #Ganda #147Farmers#नाशिक #16कृषी #अधिकारी #147शेतकरी #गंडा
Previous Post

राज्यात पुढील चार दिवस गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

Next Post

सवतीला पळवून लावल्यामुळे पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सवतीला पळवून लावल्यामुळे पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

सवतीला पळवून लावल्यामुळे पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

Comments 1

  1. kardinal stick says:
    2 months ago

    288828 5421hello I was extremely impressed with the setup you used with this web site. I use blogs my self so excellent job. definatly adding to bookmarks. 694826

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697