माढा : माढा तालुक्यातील उपळाई ( Uppalai) खुर्दचे विद्यमान सरपंच (Sarpanch) संदीप विष्णूपंत पाटील यांच्यावर दारफळ येथील आनंद बारबोले याने पिस्तुल (pistal) मधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पिस्तुल लॉक झाल्याने पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले. (Assault)
सरपंच संदीप पाटील यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी आनंद बारबोले हा प्रमोद जाधव यांचा मेव्हणा असून तो आर्मीमध्ये (armi) नोकरीला असल्याची माहिती आहे. दरम्यान प्रमोद हा पेट्रोल पंपावरून (petrol pump ) डिझेल पेट्रोल चोरी करत असल्याबाबत संदीप पाटील यांनी विचारपूस केली असता त्याचा राग मनात धरून ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त (Primary circle) आहे.
याबाबत माढा (madha) पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी संदीप पाटील हे त्यांच्या उपळाई खुर्द येथे घरासमोर उभे असताना प्रमोद लक्ष्मण जाधव, विनोद लक्ष्मण जाधव, सुवर्णा लक्ष्मण जाधव, कौशल्या अभिमन्यू जाधव, ( सर्व रा.शिंदेवाडी ता.माढा) व आनंद शिवाजी बारबोले, तनुला आनंद बारबोले (रा दारफळ सीना ता माढा) हे आले व त्यांनी फिर्यादीला तुम्ही प्रमोदवर डिझेल चोरीचा खोटा आरोप (False accusation of theft) का केला, असे म्हणून शिवीगाळ (Swearing) केली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यावेळी संदीप पाटील यांच्या भावकीतील किरण पाटील व समाधान पाटील यांनी आरोपींना उद्देशून तुम्ही संदीप पाटील यांना शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली. महिलांनी हाताने व लाथा बुक्क्यांनी तर प्रमोद जाधव याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने संदीप पाटील यांच्या भावकीतील लोकांना मारहाण (Beating) केली.
संदीप पाटील सोडविण्यासाठी मध्ये गेले असता विनोद जाधव हा संदीप पाटील याच्या अंगावर धावून गेला व आनंद बारबोले याने त्याच्या जवळील पिस्तुल काढून संदीप पाटील यांच्यावरती रोखून जीवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग (fairings) केली.
या प्रकरणी सर्व आरोपींना अटक (arrested) केली आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी (At the scene) भेट देऊन चौकशी (inquire) केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक (police inspector) शाम बुआ करत आहेत.