मुंबई : कोरोनाबाबत राज्य सरकारने (state government) मोठा निर्णय घेतला आहे. नाईट कर्फ्यूची (night curfew) घोषणा करण्यात आली. रात्री 11 ते सकाळी पाच यावेळेत ही अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमाव बंदीचे आदेश (order ) लागू करण्यात येणार आहेत. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध (Restrictions) असतील. 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून नवी नियमावली ( new rules) लागू होईल.
महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. 10 जानेवारीपासून राज्यातील स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद (close) ठेवण्यात येणार आहे. चित्रपटगृह रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. खासगी कार्यालये (private offices) 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. ज्यांनी दोन डोस (two doses) घेतले आहेत त्यांनाच कार्यालयात येऊन काम करता येईल. कोरोना लसीचे (corona vaccine) दोन डोस घेतले असतील तरच तुम्हाला प्रवासाची मूभा असेल.
राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय (important decision) घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका (marathon meetings) सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. हे नवे नियम रविवार (9 जानेवारी) मध्यरात्री (Midnight) बारा वाजेपासून लागू होतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके काय-काय? उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी. नाईट कर्फ्यू घोषित केलाय.
राज्यात आता दिवसा जमावबंदी (Daytime curfew) लागू करण्यात आलीय. दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार. नाट्यगृह, सिनेमागृहांना (To the cinemas) आसन क्षमतेनुसार फक्त 50 टक्के ग्राहकांसाठी परवानगी राज्यातील हॉटेल (hotel ) आणि रेस्टॉरंट (Restaurant) रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद.
दिवसा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 72 तास (72 hours) आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक राहील. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक ( Social, cultural, political or religious) असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित (Limited) असेल.
अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसारच (guidelines) नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील. देशांतर्गत प्रवासासाठी दोन्ही लसींचे डोस लागतील. आंतरराज्यीय प्रवासासाठी प्रवासाच्या 72 तासांआधी आरटीपीआर टेस्ट झालेली असावी. त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह असावा.
सार्वजनिक वाहतूक (Public transport) व्यवस्थेचा वापर हा फक्त दोन्ही डोस झालेल्यांसाठी करता येईल. स्पर्धा परीक्षा (Competitive examination) या भारत सरकारच्या नियमावलीनुसार घेतल्या जातील. सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थिती असेल. पण कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले असावेत.
एकही डोस बाकी असल्यास त्यांना कार्यालयात उपस्थित राहता येणार नाही. राज्यातील शाळा (school), कॉलेज (college ) 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या कोचिंग क्लासेससाठी (Coaching classes) सूट देण्यात आली आहे. इतर सर्व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील.
□ नवे निर्बंध – 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा बंद 10 जानेवारीपासून महाराष्ट्रात नवे निर्बंध
• एन्टरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम, किल्ले आणि तिकीट (tikit) लागणाऱ्या इतर सार्वजनिक जागा बंद.
• शॉपिंग मॉल, shopping mall मार्केट कॉम्प्लेक्समध्ये मर्यादित प्रवेश. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
• रेस्टॉरंट्स आणि उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सुरू. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
• लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच सरकारी ऑफिसमध्ये जायची परवानगी.
• दहावी, बारावीच्या (10th, 12th) परीक्षा वगळता महाराष्ट्रातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
• हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 7 काळात हेअर कटिंग (hair cutting) सलून बंद राहतील.
• क्रीडा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार नाहीत. राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स या प्रेक्षकांशिवाय होतील आणि स्पर्धकांना आणि अधिकाऱ्यांना बायो बबलमध्ये रहावे लागेल.