हैदराबाद : राजामौली यांचा आर आर आर RRR चित्रपट (film) रिलीजपूर्वीच (releas) अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाविरुद्ध तेलंगणा (telagana) हायकोर्टात (court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमधील अल्लूरी सौम्या या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. तसेच चित्रपटावर बंदी (ban ) आणावी. या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट (censor certificate) देण्यात येऊ नये अशी मागणीही (demand) त्याने याचिकेत केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली (s s rajmouli ) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘RRR’ च्या प्रदर्शनाची तारीख (date) पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच हा चित्रपट आता रिलीज आधीच वादाच्या भोवऱ्यात (In the midst of controversy) अडकल्याचे सांगितले जात आहे.
पीआयएल (PIL) अर्थात जनहित याचिका या चित्रपटाच्या विरोधात तेलंगणा येथे दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या रिलीजवर बंदी आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यासंदर्भातील वृत्त (news) समोर आले आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार तेलंगणामधील पश्चिम गोदावरी येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने ‘RRR’च्या विरोधात ही जनहित याचिका दाखल केली आहे. इतिहासाची (history) या चित्रपटात मोडतोड करण्यात आल्याचे म्हणत या विद्यार्थ्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी आपल्या याचिकेत केली आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या चित्रपटात दोन स्वतंत्र सैनिक अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे या विद्यार्थ्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट दिले जाऊ नये आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, अशी चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या या विद्यार्थ्याने (students) आपल्या याचिकेत (In the petition) मागणी केली आहे.
स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास बदलून किंवा मोडतोड करून या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायधीश उज्जवल भूयन आणि वैंकटे्शवर रेड्डी यांनी सुनावणी केली. आता पुढील सुनावणीची प्रतिक्षा (wait) आहे. दरम्यान याबाबत दिग्दर्शक (Director) राजामौली किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती (Official information) देण्यात आलेली नाही.
‘RRR’ मध्ये ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) आणि रामचरण तेजा (ramcharan teja) यांनी अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट (alia bhatt) आणि अजय देवगण (ajay devgan) यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका (important role) आहेत. हा चित्रपट सुरुवातीला सात जानेवारीला (janewari) रिलीज होणार होता, पण देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.