मोहोळ : निर्माण फर्टिलायझर्स ( Nirman Fertilizers) या खत तयार करणाऱ्या कंपनीत (Company) काम (work) करणाऱ्या १२ कामगारांना उग्र वासाने ( Foul smell) अचानक श्वसनाचा त्रास (respiratory problems) सुरू झाल्याने तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटल (civil hospital) येथे पाठवण्यात आले. ही घटना आज (शुक्रवारी) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मोहोळ (Mohol) पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरानजीक तांबोळे रोडवर असलेल्या निर्माण फर्टिलायझर्स ही खत तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत कोळेगाव येथील डोंबारी समाजातील महिला व पुरुष (women’s & men काम करतात. दि ७ जानेवारी रोजी दिवसभर कंपनीत कामावर गेले असता त्या ठिकाणी खतामध्ये मिश्र करण्यासाठी आणलेले उग्र वासाचा पदार्थ (Stinky food) गाडीतून उतरवून सायंकाळी पाचच्या दरम्यान हे सर्व मजूर आपापल्या घरी गेले. घरी जाऊन बसेपर्यंत सर्वांना उलट्या व श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्वांना नातेवाइकांनी तातडीने मोहोळ येथील गावडे हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अचानक आज श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सर्वांना ऑक्सिजन लावण्यात आले. या ठिकाणी डॉ समाधान गावडे, डॉ. नुर खान, डॉ. जिलाणी खान यांनी ऑक्सीजन लावून प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (government hospitals) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची खबर मिळताच तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे यांनी गावडे हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय दवाखान्यात पाठवून दिले.
यामध्ये पूजा सुरेश शिंदे, सविता युवराज शिंदे, रेश्मा सुनिल पवार, कल्पना रमेश शिंदे, उषा सचिन पवार, सुरेखा रवी जाधव, रेखा सुनिल पवार, अंजली विजय पवार, रेश्मा सचिन जाधव , स्वप्ना नितीन पवार या आठ जणांना रुग्णवाहिकेतून ऑक्सिजन लावून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
□ मोहोळमधील अपघातात दोन ठार
मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या एका मालट्रकने ( Maltrakne) पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. हा अपघात (accidents) सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील यावली शिवारात शुक्रवारी (Friday) (दि.७) सकाळी सात वाजता झाला.
रोहित गुलबाके व मनोजकुमार गुलबाके (दोघेही रा. चांदोरा खुर्द, जिल्हा बैतूल, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालट्रक (आरजे ९/जीए ५५०५) पुण्याकडे निघाला होता. त्याचवेळी मालट्रक (एमएच १२ एसएक्स ४१७४) हा पुण्याच्या (pune) दिशेने जात होता. समोरच्या उभ्या ट्रकने पार्किंग लाईट न लावल्याने तसेच दाट धुक्यामुळे पुढचे काहीही न दिसल्याने पुण्याकडे निघालेल्या दुसऱ्या मालट्रकने उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात दोन जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. याबाबतची माहिती मोहोळ पोलिसांना समजल्यानंतर दोन क्रेन (crane) बोलावून दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच मालट्रकमध्ये अडकलेले मृतदेहही क्रेनच्या साह्याने बाजूला काढले.