नवी दिल्ली : पंतप्रधान (pm) नरेंद्र मोदींनी (narendra modi) मोठी घोषणा (announcement) केली आहे. देशात आता प्रत्येक वर्षी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस (Veer baal divas) साजरा केला जाणार आहे. मोदींनी ट्विट (tweet) करत म्हटलं की, ‘श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्वाच्या (prakash parv) पावन प्रसंगी मला हे सांगताना अभिमान वाटत आहे, यावर्षीपासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. ही साहिबजाद्यांच्या साहसाला एक आदरांजली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोविंद सिंगजी यांची जयंती अर्थात ‘गुरू पर्वा’निमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जाणार आहे. गुरू गोविंद सिंगजी (guru govind singji) यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली म्हणून पंतप्रधानांच्या या निर्यणाकडे पाहिलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी (Sunday) प्रकाश पर्वानिमित्त दहावे शीख गुरू गोविंद सिंगजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणाले की, ‘गुरू गोविंद सिंगजी यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना शक्ती देते. एवढंच नाही तर गुरू गोविंद सिंग यांची 350 वी जयंती साजरी करण्याची संधी (opportunities) आपल्या सरकारला मिळाली, याचा मला नेहमीच आनंद (happy) वाटत राहील.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले, ‘वीर बाल दिवस, Veer Bal Diwas हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग यांनी या देशासाठी बलिदान (Sacrifice) दिले आणि त्यांना भिंतीत जिवंत चिनून मारण्यात आले होते. या दोन महान व्यक्तींनी इतर कोणताही धर्म स्वीकारण्याऐवजी मृत्यू (die) स्वीकारला होता.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग हे गुरुगोविंद सिंग यांच्या चार सुपुत्रांपैकी तिसरे आणि चौथे पुत्र औरंगजेबाच्या (ouragjeb) मुघल सल्तनतीशी लढताना शीख समाजाने जे शौर्य दाखवले या शौर्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे. त्यातही त्यांचे चारही पुत्र औरंगजेबाच्या मुघल सल्तनतीशी लढताना शहीद झाले. ही शहीदी संपूर्ण देशासाठी आणि शीख समाजासाठी अतिशय प्रेरणादायी (Inspirational) आहे.
औरंगजेबासारखा क्रूरकर्माने गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या मुलांवर धर्मांतराची सक्ती केली परंतु त्या सक्तीला न जुमानता त्यांनी हौतात्म्य पत्करले. साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग (fathe sing) या दोघांनाही मुघल सैनिकांनी औरंगजेबाच्या आदेशानुसार भिंतीत चिणून मारले. परंतु त्यांनी आपला पवित्र शीख धर्म (Holy Sikhism) सोडला नाही आणि ते धर्मांतर करून मुसलमान बनले नाहीत. हे त्यांचे सर्वोच्च बलिदान (Supreme sacrifice) आहे. या बलिदानाचा सन्मान करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर यापुढे वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
□ साहेब जादे यांची वीरगाथा
साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या बलिदानाचा अनेक गाथा पंजाब (panjab) मध्ये लोककथा, लोकगीते या स्वरूपात सादर करण्यात येतात. जोरावर सिंग हे फतेहसिंह यांचे थोरले बंधू. या दोघांना उभे करून मोगल सैनिक भिंत बांधत असताना जोरावर सिंग यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यावेळी फतेहसिंह त्यांना म्हणाले, आपण धर्मासाठी वीरमरण (Heroic death) पत्करत आहोत आणि तरीही बंधू तुझ्या डोळ्यात अश्रू!!, त्यावेळी जोरावर सिंग म्हणाले मी मोठा आहे.
ही भिंत तुझ्या आधी माझ्या खांद्यापर्यंत यावी, असे मला वाटत होते. हे धैर्याचे उद्गार काही क्षण मुघल सैनिकांनाही विचलित करून गेले. परंतु औरंगजेबासारखा क्रुरकर्मा (Cruel karma like Aurangzeb) याला त्याचे काही वाटले नाही. साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्याचा सन्मान (Honor of martyrs) करण्यासाठी देशभर इथून पुढे 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.