सोलापूर : माजी आमदार ( ex mla) तथा बाजार समितीचे संचालक दिलीप माने (dilip mane) यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील फार्महाऊसवर (farmhouse) सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक (meeting) पार पडली. जिल्ह्याचं नेतृत्व बबनदादा व सोपल साहेबांनी करावं, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती (information) आहे.
या बैठकीला ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (DCC bank) संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख या प्रमुख नेत्यांची उपस्थिती (attended) होती. यावेळी महाविकासआघाडी (mahavikas aghadi) मधील राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), शिवसेना (shivsena), काँग्रेस (congress) , शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (ganpatrao deshmukh) व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक (sudhakarpant paricharak) हे दोन्ही नेते एकत्रित बसून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा दूध संघाची (milk) मोट व्यवस्थित बांधत होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यामध्ये मोठी पोकळी ( Large cavity) निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून निघावी हा या बैठकी मागचा उद्देश (Purpose) होता, हे काय लपून राहिले नाही.
आगामी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघाची निवडणूक (election) ही एकत्रितपणे येऊन लढवायची तसेच जिल्हा परिषद (zp) आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करून या माध्यमातून सर्व निवडणुका लढवायच्या असे या बैठकीत निश्चित झाल्याचे वृत्त (news) आहे.
मात्र या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणे आणि समन्वय ठेवण्यासाठी ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री (ex minister) दिलीप सोपल या दोन नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्याचे ठरले आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती (spekar) आमदार विजयकुमार देशमुख हे सध्या राजीनामा (resigned ) देण्यास तयार नाहीत, त्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर झालेली ही बैठक निश्चितच अनेक राजकीय समीकरणे बदलणारी ठरणारी आहे. या बैठकी आडून आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर दबावतंत्र (Pressure system) वापरले जाणार का, अशीही चर्चा होत आहे.
□ सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव होणार कमी
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (milk production) संघाच्या मतदार यादीसाठी ६९ हरकती मान्य केल्याने मतदार यादीत (voter list) वाढ होणार आहे.
अक्कलकोटचे (akkalkot) माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याबाबतची हरकत मान्य केल्याने त्यांचे मतदार यादीतील नाव कमी होणार आहे. ४८ हरकती फेटाळण्यात (Dismissing objections) आल्या आहेत. १० जानेवारी रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध (Voter lists published) केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी ११७ हरकती आल्या आहेत. एक तक्रार नावात दुरुस्ती (mending) करण्यासाठी देण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सांगवीच्या श्रीगणेश दूध संस्थेचे लेखापरीक्षण (Audit ) झाले नसताना या संस्थेचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव मतदार यादीत आले आहे. याला जगदंबा दूध संस्था डिकसळ संस्थेच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. ती मान्य करण्यात आल्याने म्हेत्रे यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार आहे.
प्रारूप मतदार यादीत १० तालुक्यांतील २६३ दूध संस्थांची नावे होती. म्हेत्रे यांचे नाव (name) वगळल्याने २६२ संस्था राहणार असून, हरकती मान्य झालेल्या ६८ संस्थांचा मतदार यादीत समावेश होणार आहे.
मोहोळमधील दूध संस्थांनी दाखल केलेल्या हरकती ८१ हरकतींपैकी ४७ हरकती मान्य झाल्याने मोहोळमध्ये ४७ मतदार वाढले आहेत. नव्याने समाविष्ट (includes) झालेल्या मतदारांमध्ये माजी आमदार राजन पाटील (rajan patil) यांच्या गटाच्या संस्थांची संख्या लक्षणीय असल्याने दूध संघाच्या आगामी निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांचे वजन वाढले आहे.