सोलापूर : सुमारे 950 वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या (Maharaj on the village deity Siddheshwar) यात्रेस आज आज सोमवारी (10 जानेवारी) शुक्रवार पेठ येथील कै. शेटे वाड्यात योगदंड पूजनाने धार्मिक विधीस (Religious rites) प्रारंभ होणार आहे.
आज हिरेहब्बू वाड्यातून मठपती हे योगदंड शेटे आणतील, त्यांनंतर मानकरी हिरेहब्बू आल्यानंतर शेटे यांचे वारसदार अॅड. मिलींद थोबडे (Adv. Milind Thobde) कुटुंबाकडून योगदंड पूजन आणि पाद्यपूजा (Padya Puja) होणार आहे. दि. 11 जानेवारी रोजी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात (Hirehabbu Wada) मानाच्या पहिल्या व दुसर्या नंदीध्वजास रात्री 12.5 वाजता साज चढवून हिरेहब्बू व देशमुख (Deshmukh) यांच्या हस्ते विधीवत पूजा ( Ritual worship) होईल.
दि. 12 जानेवारी रोजी योगदंड व मानकर्यांच्या उपस्थितीत 68 लिंगाना तैलाभिषेक (Anointing) होईल. दि.13 जानेवारी रोजी सिध्देश्वर मंदिरातील संमत्ती कट्यावर सातही नंदीध्वजाच्या साक्षीने योगदंड आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा (Wedding ceremony) पार पडणार आहे. यावेळी समंत्ती वाचन सुहास तम्मा शेटे करणार आहेत. व त्यानंतर योगदंडसह यात्रेतील सातही नंदीध्वजाचे मानकरी 68 लिंग प्रदक्षिणा करणार आहेत.
दि. 14 जानेवारी रोजी श्री सिध्देश्वर मंदिरातील (Shri Siddheshwar Temple) तलावात योगदंडासह मानाच्या सातही नंदीध्वजांना करमुटगी लावून स्नान (bath) घालण्यात येते. मात्र यंदा या विधीस प्रशासनाने परवानी (permission) नाकारली आहे. सायंकाळी जून्या फौजदार चावडीजवळ पहिल्या नंदीध्वजास नागाची फणी बांधतात. मात्र यंदा मिरवणुकीस परवानगी नाकारण्यात आली असल्याने हा कार्यक्रम होणार नाही. त्यानंतर यंदा योगदंडाच्या साक्षीने होम प्रदिपन (Home illumination) सोहळा पार पडणार आहे. होम प्रदिपन सोहळा पार पडल्यानंतर सिध्देश्वर मंदिरा शेजारी असणार्या डॉ. निर्मल कुमार फडकुले सभागृहासामोर भाकणुक होईल.
दि. 16 जानेवारी कप्पडकळीने यात्रेची सांगता होणार आहे. शुक्रवार पेठेतील देशमुखांच्या वाड्यात योगदंड पूजा आणि होम होईल. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा करून देशमुखांच्या वतीने हिरेहब्बू यांना आहेर करण्यात येईल. या विधी नंरत यात्रेतील धार्मिक विधीची सांगता होईल.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेवर निर्बंध, फक्त 50 लोकांना परवानगी
सोलापूर : वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेवर (Siddheshwar Yatra Solapur ) प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. सिद्धेश्वराच्या यात्रेसाठी प्रशासनाकडून फक्त 50 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.
श्री सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत (Village Goddess) आहे. त्याबरोबरच सोलापूर (solapur) परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान (A place of worship for devotees) आहे. दरवर्षी श्री सिध्दरामेश्वरांची मोठी यात्रा सोलापुरात भरते. यंदा 12 ते 16 जानेवारीदरम्यान ही यात्रा होणार आहे. परंतु, सध्या कोरोना रूग्णांच्या ( corona Patiant) संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे यात्रेवर प्रशासनाकडून निर्बंध (Restrictions) घालण्यात आले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून (two years) कोरोनाच्या महामारीमुळे ही यात्रा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार करण्यात आली. यंदाही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर निर्बंध घातले आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे. या 50 लोकांमध्ये 15 पुजारी आणि इतर 35 लोकांचा समावेश असणार आहे. या 50 लोकांची यादी दोन दिवस आधी मंदिर समितीकडून सोलापूर प्रशासनाला सादर करावी लागणार आहे.
प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरच या 50 लोकांना यात्रेतील विविध विधींना हजर राहता येणार आहे. त्याबरोबरच यात्रेतील विधी करत असताना सुरक्षित अंतराचे पालन करूनच हे विधी करण्यात यावेत, असे प्रशासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
यात्रेत दरवर्षी तैलाभिषेकासाठी सात नंदीध्वजाची पायी मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यंदा या मिरवणुकीला परनानगी देण्यात आली नाही. नंदीध्वज वाहनातून नेहले जाणार आहेत. त्याबरोबरच संमती कट्ट्यावरील विवाह सोहळ्याला फक्त 50 जणच उपस्थित राहतील. संमती ककट्ट्यावरील सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या 50 लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. शोभेच्या दारूकामासह सुगडी पूजनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रशानाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन (Strict adherence) करूनच यात्रा (Travel) पार पाडावी लागणार आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबचे आदेश दिले आहेत.