मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री (Veteran actress) रेखा कामत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मुंबईतील (mumbai) माहिम (mahim) इथल्या निवासस्थानी (house) त्यांनी अखेरचा श्वास (death) घेतला. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा यांसारख्या चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. खूप वर्षांपूर्वी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती (Retired) स्वीकारली होती.
आजच्या तरुणांना त्या आजी (Grand mother) म्हणून ठाऊक असल्या तरी त्यांनी कृष्णधवल चित्रपटांमध्येही नायिका (actress actress) म्हणून केलेल्या भूमिका ( role) गाजल्या होत्या.
रेखा कामत (rekha kamt) आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी (sister) आहेत. त्या पाच बहिणी आणि दोन भाऊ (brother) अशी सात भावंडे. त्या मोठ्या तर चित्रा त्यांच्या पाठची. त्यांचे वडील आर्मी व नेव्ही स्टोअरमध्ये ‘लिपिक’ म्हणून नोकरी करायचे. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण कुंभारवाडा येथील शाळेत झाले. त्यानंतर त्या ‘प्लाझा’ चित्रपटगृहाजवळील मिरांडा चाळीत राहायला गेल्या. त्यांचे पुढील शिक्षण छबिलदासमध्ये झाले. वसंतराव कुलकर्णी हे त्यांचे गाण्यातील गुरू. शाळेत असतानाच त्यांनी नृत्य व गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. प्रसिद्ध नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. गणेशोत्सवात मेळ्यांमध्ये काम केले. नृत्यगुरू सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ नृत्यनाटिकेत काम केल्यानंतर दोन्ही बहिणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविला. मालिकांमध्ये ही त्यांनी काम केले. प्रतिमा कुलकर्णी (pratima kulkarni) दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका (serial) होती. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ (akka) ही भूमिका त्याकाळी गाजली होती. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. ‘आजी’ असावी तर अशी, अशी ओळख (identity) या मालिकेमुळे त्यांना मिळाली. नव्या पिढीलाही रेखा कामत हे नाव माहिती झाले. अनेक जाहिरातींमधूनही ( advertised) त्यांनी ‘आजी’ची भूमिका साकारली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम (work) केले असले तरी नाटक हे त्यांच्या अधिक आवडीचे होते.
रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित ‘यातनाघर’ तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या प्रायोगिक नाटकातही काम केले. त्यांनी केलेल्या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे.
♡》 रेखा कामत यांची कारकीर्द
१९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट. यामध्ये चित्रा यांनीसुद्धा काम केलं होतं. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फटके या त्रिमूर्तींचा हा चित्रपट होता. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावं नकोत, चित्रपटासाठी जरा आकर्षक नावं पाहिजेत म्हणून ‘गदिमां’नी रेखा आणि चित्रा असं नामकरण केल्याचं, त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. याच नावांनी त्यांनी मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि पुढे हीच नावं त्यांची ओळख बनली.
रेखा यांनी ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात त्यांची दुहेरी भूमिका होती), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘नेताजी पालकर’ चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या.