लातूर : लातूरमध्ये (latur) आयोजित कीर्तनात ज्येष्ठ कीर्तनकार (The eldest kirtankar) निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी एक विधान केलं. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून (second wave) वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म (Reincarnation) असल्याचं ते म्हणाले. तसेच आता तिसरी लाट (third Wave ) माळा काढणाऱ्यांसाठीच, असंही ते म्हणाले. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. आता डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल (hospital) कोण चालवेल? त्यामुळे हसत हसत जगा, असंही ते म्हणाले.
तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म असल्याचं विधानही निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर ( Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar) यांनी केलं आहे.
आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असं ते यावेळी म्हणाले.
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातही या कोरोनाचा दाखला देण्यात आला. एका भाविकास उद्देशून ते म्हणाले, की कीर्तनात उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हा आपला जन्म नसून पूनर्जन्म आहे. कधीतरी वारकऱ्याची सेवा केली, तुळशीला पाणी घातलं, काळ्या आईची सेवा, कधीतरी कीर्तनकाराच्या पाया पडलो, हे पुण्य आपल्याला 2021साली कामाला आलं.
आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवानं काढलाय, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. काही लोक खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत.
त्यामुळे आनंदानं, हसत हसत जगा, असा सल्ला त्यांनी दिला.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मागे नाशिकमध्ये (nashik) एक विधान (statements) केले होते. आपण कोरोनाची लस (corona vaccine) घेतली नाही आणि घेणारही नसल्याचं वक्तव्य त्यांनी किर्तनात केलं होतं. एकीकडे सरकार सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत असतांनाच भर कीर्तनात ‘मी कोरोनाची लस घेणार नाही.’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलं होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका (Comment) झाली. त्यानंतर होणा-या कीर्तनात लस घेण्याचे आवाहन (Appeal) केले होते.
कोरोना काळात डॉक्टरांच्या (doctor) हाताखालील कंपाउंडरने (campoundar) देखील गोळ्या लांबूनच दिल्या. कोरोना रुग्णांना मानसिक आधार न दिल्याने जास्त लोक मृत्यू पावले असल्याचही ते म्हणाले होते. तसंच कोरोनाला एकच औषध (medicine) आहे ते म्हणजे मन खंबीर ठेवा असही इंदोरीकर महाराज म्हटले होते. त्यांच्या या विधानाचे अनेकांनी समर्थनही केले होते .