अक्कलकोट : हर हर घर को नल या संकल्पनेतून जलजीवन मिशन (jaljeevan mission) योजना राज्य शासनाकडून राबविली जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक घरास नळ, याद्वारे शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचा संकल्प (Resolution) आहे. या योजनेंतर्गत मागणी (demand) केल्याप्रमाणे महाविकास आघाडीने अक्कलकोट (akkalkot) तालुक्यास मोठे सहकार्य केल्याचे माजी मंत्री, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ( ex mla siddhram mhetre) यांनी कौतुक केलंय.
जवळपास ४ कोटी १५ लाख तर जिल्हा नियोजन समितीकडून तालुक्यांतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ३ कोटी असे जवळपास ७ कोटी रूपयांचा मोठा निधी मंजूर झाल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Filling Guardian Minister Dattatraya) यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारकडे मागणी केली होती. यास प्रशासकीय मान्यता (Administrative recognition) मिळाली आहे.
मागणी केलेल्या सर्व कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदींनी सहकार्य केल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. सदरची कामे लवकरच सुरू होणार असून यातून अक्कलकोट तालुका दुष्काळमुक्त (Drought free) होणार आहे. तसेच वाहतुकीला मोठा आधार होणार असल्याचे सांगितले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ या गावांना फायदा (benefits)
या योजनेंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील कडबगांव – सेवालालनगरसाठी ४७ लाख ६५ हजार रूपये घोळसगांवसाठी ३९ लाख ४८ हजार रू,किणीसाठी ७८ लाख ५ हजार, चपळगावसाठी ४० लाख ५३ हजार, पितापूरसाठी २९ लाख ३० हजार, बऱ्हाणपूरसाठी ३३ लाख ६४ हजार, अक्कलकोट शहरासाठी १कोटी ७ लाख, निमगावसाठी १९ लाख ३५ हजार,रामपुरसाठी २० लाख २५हजार रू असे एकुण ४ कोटी १५ लाख ३९ हजार ८१६ रू एवढा मोठा निधी महाविकास आघाडीने मंजुरी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून रस्ते विकासासाठी ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Mhetre praises Mahavikas Aghadi government; 7 crore sanctioned for road works
□ ३०५४ योजनेंतर्गत मंजूर रस्ते
संगोगी – इब्राहिमपूर, आंदेवाडी-बबलाद, दुधनी-निंबाळ, सलगर-भिमपूर, गौडगाव-प्रजिमा ५२(जेऊर), जेऊर-डिग्गेवाडी,सांगवी खु-गोसावी, लवटेवस्ती, धारसंग-कल्लकर्जाळ, गौडगांव बु-शिवगोंड तांडा, किणीवाडी-नांदगाव, गौडगाव बु-प्राजिमा ५२, आंदेवाडी-हिळ्ळी, किणीवाडी पालापूर-चुंगी बोरगांव या रस्त्यांना मिळणारा पालापुरजवळचा रस्ता, सलगर-भिमपूर, जेऊर-कोन्हाळी, बोरगाव दे-किरनळ्ळी, गोगाव पडसलगी रस्ता..
□ ५०५४ योजनेंतर्गत मंजूर रस्ते
कल्लकर्जाळ-प्रजिमा ५९ ला जोडणारा रस्ता, तोळणूर-बोरोटी- आंदेवाडी-दुधनी, शिरवळ-बणजगोळ, हालचिंचोळी- प्रजिमा ५२, अक्कलकोट – तामतानळ्ळी- गुरववाडी- व्हसुर ,तोळणूर -आंदेवाडी- दुधनी,सुलेरजवळगे – अंकलगी, हंजगी- ब्यागेहळ्ळी- अक्कलकोट
□ यापुढेही महाविकास आघाडीचे सहकार्य मिळविणार – म्हेत्रे
महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi government) अक्कलकोट तालुक्यासाठी न भुतो न भविष्यती अशी मदत (help) केली आहे. आम्ही मागणी केल्याप्रमाणे ठाकरे सरकारकडून यापूर्वीच एकरूखची योजना पूर्णत्वास जाण्यासाठी ५० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. आता तालुका दुष्काळमुक्त होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेतून पुन्हा मदत झाली आहे. यापुढील काळातदेखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासासाठी शक्य तितक्या प्रमाणात सहकार्य घेणार आहे.