सोलापूर – मावा (mava) विकत असताना व्हिडिओ शूटिंग (video shutting) केल्याच्या कारणावरून तलवार आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत रामलिंग चंद्रकांत सकट (वय ३४) हे जखमी झाले. यावेळी चालू असलेले भांडण सोडविण्यास गेल्यानंतर त्यांना देखील मारहाण झाल्याने सुमित सुधाकर रूपनर (वय २९) आणि प्रभाकर गोपीनाथ बचुटे (वय ४३) हे दोघे देखील जखमी झाले. ही घटना आमराई परिसरातील औसे वस्ती येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली .
त्यांना दीपक राजगुरू, किरण राजगुरू आणि गणेश राजगुरू यांनी मारहाण केली. अशी नोंद फौजदार चावडी पोलिसात (fouzdar cawadi police) झाली. यावेळी घराजवळ शिवीगाळ होत असल्याने बाहेर येऊन पाहत असताना लाथा ने पोटात मारल्याने रेणुका दीपक राजगुरू (वय २६ रा.औसेवस्ती) ही महिला देखील जखमी झाली. त्यांना रामलिंग सकट आणि राजू सकट आदींनी मारहाण केली. सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल करण्यात आले, अशी नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे.
■ खाजगी आराम बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू
सोलापूर – कोल्हापूर ते सोलापूर (kohlapur-solapur) या खाजगी बस (private bus) मधून प्रवास करताना राजेश बबन ससाणे (वय ४२ रा. ऊळे ता.दक्षिण सोलापूर) हे मयत झाले. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली.
राजेश ससाणे हे मंगळवारी रात्री कोल्हापूर येथून सोलापूरकडे एमएच०९-२७५४ या खाजगी बसमधून प्रवास करीत होते. सकाळी सोलापूरातील कमल हॉटेल नजीक बस थांबली. तेंव्हा सर्व प्रवासी उतरून गेले. स्लीपरवर ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. Stabbed as filmed selling mava; Innocent on appeal in punishment of accident
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याची माहिती बस चालकाने फौजदार चावडी पोलिसांना कळविली. पोलीस नाईक मस्के हे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ते उपचारापूर्वीच मयत झाले. अशी नोंद पोलिसात झाली आहे.
□ अपघातामधील शिक्षा अपिलात निर्दोष
सोलापूर – मोहोळ (mohal ) येथील अपघातामध्ये आरोपीला झालेली ६ महिन्याची शिक्षा अपिलात अतिरिक्त सत्रन्यायाधीश व्ही.पी. पाटवदकर यांनी रद्दबातल ठरवली.
१ नोव्हेंबर २०१० रोजी पोखरापूर (ता. मोहोळ) येथे दुचाकीच्या धडकेने इब्राहिम शेख हे सायकल स्वार गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात मोहोळच्या पोलीसांनी हनुमंत भगवान गोंडाळ (वय ५६ रा.पापरी ता.मोहोळ) याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मोहोळच्या न्यायालयाने गोंडाळ याला दोषी ठरवून याला दंड आणि ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षा विरुद्ध त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपीच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हनुमंत गोंडाळ यांना निर्दोष मुक्त केले.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड गुरुदत्त बोरगावकर, ॲड स्वप्निल सरवदे तर सरकारतर्फे ॲड दत्ता पवार यांनी काम पाहिले.
hello!,I love your writing very a lot! share we be in contact extra approximately your article on AOL? I need an expert on this space to unravel my problem. May be that’s you! Taking a look forward to look you.
Hello” i can see that you are a really great blogger.
Great paintings! That is the kind of info that are meant to be shared across the internet. Disgrace on the seek for no longer positioning this put up higher! Come on over and consult with my site . Thanks =)