बार्शी : गेली दोन वर्षे (two years) बार्शीत (barshi) चर्चेत असलेला विशाल गुंतवणुकीचा फुगा अखेर फुटला आहे. झटपट पैसे (money) कमविण्याच्या लोभाने राजकारणी, अधिकारी, व्यापार्यांनी केलेली सुमारे 200 कोटीची गुंतवणूक घेवून बिगबुल (bigbull) कुटुंबाला घेवून फरार झाल्याची चर्चा आहे.
गेल्या चार दिवसापासून बिग बुलचा फोन स्विच ऑफ (phone switch off) आहे तर कार्यालयाला टाळे लागलेले आहे. बहुसंख्या गुंतवणूकदारांची (investor) संपत्ती बेहिशोबी असल्यामुळे अजूनतरी पोलिसांकडे (police) रितसर दाद मागायला कोणी गेलेले नाही. त्यातच बिगबुलचे जिल्ह्यातील उच्चपदस्थ पोलिस अधिकार्यांसोबतचे फोटो (officers images) सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Social media vairal) होत आहेत. त्यामुळेही वेगवेगळ्या शक्यतेच्या चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या दोन वर्षापासून शेअर मार्केट (share market) मध्ये गुंतवणुकीतून झटपट पैसे कमावण्याचा फंडा (funda) बार्शीत चर्चेत आहे. तसा शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा व्यवसाय बार्शीकरांना नवीन नाही. गेल्या अनेक वर्षापासून शेअर बाजारात अभ्यासपूर्ण सुरक्षित गुंतवणूक करणारे आणि गुंतवणूकदारांना सेवा देणारे बार्शीत अनेक सबब्रोकर (subbroker) आहेत. मात्र त्यांनीही कधी परताव्याबाबत अव्वाच्या सव्वा किंवा अगदी छातीठोकपणे भरघोस नफ्याची खात्री दिली नाही. त्यामुळे शेअर बाजाराची चर्चा बार्शीत दोन वर्षांपूर्वी जेमतेमच होती.
मात्र बिगबुलने पध्दतशीरपणे बार्शीकरांचा अंदाज घेत हळूहळू गाजावाजा करत मासिक 28 टक्के परताव्याची जाहिरात (advertisement) करायला सुरुवात केली आणि अनेकांचे डोळे दिपले. मासिक 28 टक्के म्हणजे वर्षाला 336 टक्के नफा. एवढा नफा तर सध्या कोणत्याच कायदेशीर व्यवसायात मिळत नाही. त्यातच कोरोनामुळे (corona) गेली दोन वर्षे असे-तसेच गेलेले. त्यामुळे विशाल गुंतवणूकीवर बार्शीतल्या राजकारणी political, अधिकारी officers, व्यापारी Merchant, डॉक्टरांच्या doctor अक्षरक्ष: उड्या पडल्या. पहिल्यांदा सावधपणे केलेली अल्प गुंतवणूक जाहीरातीप्रमाणे खरी ठरली. मग काय झटपट पैसे कमविण्याची नशा जडलेल्या लोभटांनी पहिल्यांदा पेट्यांनी आणि नंतर खोक्यांनी डोळे झाकून भरभरून पैसा ओतला. The huge investment bubble in Barshi finally burst; Talk of hitting Rs 200 crore
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गुंतवणुकीचा पैसा बेहिशोबी असल्यामुळे ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ म्हणून हा व्यवहार रितसर कागदावर झालाच नाही. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याची देशभर चर्चा असताना आपल्याला हा छप्पर फाडके परतावा (Return the roof) कसा मिळणार? याचा साधा सुध्दा विचार कोणी केला नाही. काही धनलोभ्यांनी अक्षरक्ष: मिळतील तेथून पैसे आणून विशाल गुंतवणूकीत (huge investment) ओत-ओत ओतले. प्रारंभी मिळालेला परतावा मुद्दलासोबत परत गुंतवताना आणि वारंवार गुंतवताना अनेकांना दिवसाच कुबेराच्या खजिन्यात लोळण्याची स्वप्ने (dream) पडू लागली.
कोरोनाची साथ ज्या वेगाने पसरत होती, त्याच्या कैकपटीने विशालच्या गुंतवणुकीचा ओघ वाढला होता. खुद्द बिगबुललाही आपल्या मार्केटिंगला एवढे यश लाभेल याची कधी कल्पना आली नसेल. हजार, लाखावरुन आकडा कोटीत आणि नंतर अब्जामध्ये गेला आणि बिगबुलचेही डोळे पांढरे होवू लागले. तरीही गुंतवणूकदारांचा ओघ कायम होता. विशाल गुंतवणुकीची नशाच जणू त्यांना झाली होती.
काल-परवा पर्यंत सगळं सुरळीत सुरु होतं. शेअर मार्केट उसळी मारो किंवा पाताळात जावो, इकडे नवीन ग्राहकाचे पैसे जुन्या ग्राहकाच्या (old customers) परताव्याला आणि जुन्या ग्राहकाची नवीन गुंतवणूक पुन्हा ढिगार्यात भर घालायला तयारच होती. त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद होता. मात्र अखेर जाणकारांना ज्याची खात्री होती तो विशाल गुंतवणुकीचा फुगा एकदाचा फुटलाच आणि त्यातून बाहेर आली ती फक्त हवाच. सगळा पैसा गडप झाला. बिगबुलही अंतर्धान पावला.
मग काय जिकडे-तिकडे बिगबुलच्या बकर्यांची चर्चा सुरु झाली. कोणी म्हणे गुंतवणूकदारांनीच आपले पैसे मिळविण्यासाठी त्याला पळवून नेला तर कोणी म्हणे पध्दतशीर प्लॅनिंग करुन बिगबुल देशाबाहेर गेला. काहीही असो गुंतवणूकदारांच्या डोळ्यासमोर सध्या दिवसा तारे चमकू लागले आहेत. मुकी बिचारी, हाक ना बोंब अशी त्यांची अवस्था झाली आहे. पैसा बेहिशोबी आहे आणि बिगबुलकडे तर हिशोबच नाही. त्यामुळे दाद मागायची तर कशी आणि कुणाला या प्रश्नाने त्यांना हवालदिल केले आहे. भरीसभर बिगबुलचे जिल्ह्यातील उच्च पदस्थ पोलिस अधिकार्यांसोबतचे फोटोच सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे जरी धाडस करुन पोलिसात गेले तरी ‘तेल पण गेले आणि तूप पण गेले, हाती धुपाटणे आले’ (The oil is gone and the ghee is gone too) अशी अवस्था होण्याचीच दाट शक्यता दिसत आहे.
त्यामुळे बेहिशोबी गुंतवणूकदार मोठ्या कोंडीत सापडला आहे. त्यामुळे सध्या जी नावे चर्चिली जात आहेत, त्यांच्याबरोबर भगवंताच्या काठीला आवाज नसतो, असा सूर फुटला तर नवल नाही.