मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Mumbai District Central Cooperative Bank ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका (big blow) बसला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांचे बँकेवरील वर्चस्व संपुष्टात आले आहे. मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिध्दार्थ कांबळे विजयी झाले आहेत. तर भाजपचे प्रसाद लाड (prasad lad) पराभूत झाले आहेत. कांबळे यांना 11 तर प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली. उपाध्यक्षपद भाजपकडे गेले आहे.
मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसचे सिध्दार्थ कांबळे विजयी झाले. त्यामुळं मुंबै बँक प्रवीण दरेकर यांच्या हातून निसटली आहे. यानंतर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘निवडणुकीपूर्वी सरकार म्हणून पुढे येत तिन्ही पक्षांनी एकत्र ही निवडणूक लढवली. मी विरोधी पक्ष नेता असल्यानं आणि माझ्या हातात बँकेचं नेतृत्व असल्यानं महाविकास आघाडीनं एकत्र येऊन ही खेळी केली. ‘
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि सेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची घोषणा केली. अखेरीस या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble as President) यांची निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग बँक (Sindhdurg bank ) निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याची परतफेड महाविकास आघाडीने मुंबई बँक निवडणुकीत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई बँकेतील प्रतिनिधीची एकत्र बैठक पार पडली. Big blow to BJP, NCP’s Siddharth Kamble is the new chairman of Mumbai Bank
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे दाखवून मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवली. यामुळे मुंबई बँक व लाखो ठेवीदारांची फसवणूक झाली असून याप्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात आम आदमी पक्षाने तक्रार दाखल केली आहे, असे ‘आप’ (AAP) चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे बँकेची प्रवीण दरेकर यांच्याकडे सूत्रे होती. मात्र त्यांचा मजूर म्हणून बॅंकेवर निवडून येण्याचा फंडा यंदा वादात सापडला होता. त्यामुळे दुसऱ्या मतदार संघातून ते संचालक पदी म्हणून निवडून आले. संचालकांत शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस, असे एकूण 11 संचालक होते. भाजपकडे 9 संचालक होते.
मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मते मिळाली. उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना 10 मते आणि भाजपच्या विठ्ठल भोसले यांना 10 मते मिळाली. गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी भोसले यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने निवडणूक आयोगाने त्यांना उपाध्यक्ष पद घोषीत केले. भाजपचे विष्णू भोंगळे यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीला अध्यक्षपदासाठी मतदान (voting) दिले. त्यामुळे भाजपला पराभवाचा धक्का बसला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मते पडली.
भाजपकडे 10 मते होती, विष्णू भुंबरे हे फुटले. त्यामुळे महाविकास आघाडीला 11 मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करुन ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
Sometimes, blogging is a bit tiresome specially if you need to update more topics.;’*~.
I am very enjoyed for this blog. It’s an informative topic. It help me very much to solve some problems. Its opportunity are so fantastic and working style so speedy. I think it may be help all of you. Thanks.
I really like and appreciate your post.Really looking forward to read more. Much obliged.
Thank you ever so for you article post.Thanks Again. Really Great.
Very informative article post.Much thanks again. Great.
Looking forward to reading more. Great article.Thanks Again. Great.
Really appreciate you sharing this article. Will read on…
A round of applause for your blog article.Much thanks again. Really Cool.