मुंबई / लखनौ (mumbai/ uttar pradesh) : शिवसेना भाजपला देशात प्रत्येक ठिकाणी धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (up chif minister) योगी आदित्यनाथ (yogi Adityanath) हे अयोध्येतून लढणार असल्याची चर्चा आहे, तिथे शिवसेना ही आपला उमेदवार देऊन ताकद दाखवणार आहे. तसेच, मथुरेतून शिवसेना (shivsena) प्रचाराला सुरुवात करणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत mp sanjay raut यांनी दिली आहे. संजय राऊत आज भाजपविरोधात वक्तव्य करणारे राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्याशी भेटणार असून निवडणुकीबाबत चर्चा करणार आहे.
येथे शिवसेना 50 ते 100 जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. राजकीय गणितं जुळवण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी संयुक्त किसान मोर्चाचे ( Samyukta Kisan Morcha) सर्वेसर्वा तथा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर खुद्द राकेश टिकैत यांनी मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी मला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण (Invitation) दिले आहे. तसेच मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे टिकैत यांनी माध्यमांना सांगितले.
राजेश टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण
“आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही,” अशी प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे. याआधी संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत (press conference) राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच राकेश टिकैत कोणत्याही नेत्याला भेटत नाहीत. तसेच ते राजकारणात सहभागी होत नाहीत. तरीदेखील ते मला भेटत आहेत, असे राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये दुपारी भेट झाली. या भेटीचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल (Social media vairal) झाले आहेत.
Shiv Sena will teach BJP a lesson, will contest elections against Yogis
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्यात मुझफ्फरनगर येथे भेट झाली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा (Discussion on political issues) झालेली नाही. फक्त उद्धव ठाकरे यांनी टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
आज मुजफ्फरनगर में किसान नेता श्री राकेश टिकैत से मुलाकात कर उत्तर प्रदेश के किसानों की गंभीर समस्याओं व मुद्दों और देश की राजनीति पर प्रदीर्घ चर्चा हुई। खासकर, वेस्टर्न यूपी के ज्वलंत मुद्दों पर मंथन हुआ। शिवसेना किसानों को उनका न्याय दिलाने के लिए समर्पित है। pic.twitter.com/tNRD8T1CbV
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 13, 2022
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. अयोध्या, मथुरेत (Ayodhya, Mathura) शिवसेना उमेदवार राहतील. अशात शिवसेनेच्या प्रचाराची सुरूवात मथूरेतून करा, असा स्थानिकांचा आग्रह असल्याने त्यासंबंधी लवकरच निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केले.
उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला. यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना हवेचा लवकर अंदाज येतो. यानुसार ते पक्ष बदलत असतात. कुणी कितीही ओपिनियन पोल (opinion poll ) सत्ताधाऱ्यांच्या बाजूने दिले तरी जमिनीवरील स्थिती वेगळी आहे. भाजपला सहजतेने विजय मिळेल असे वाटत नाही. विरोधक एकवटले आहेत. यातून ही पळापळ सुरू असल्याचे म्हटले.
□ अयोध्या, मथुरेतूनही उमेदवारी
शिवसेना उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केलेला आहे. बलिदान दिलेलं आहे. अयोध्येचं आंदोलन थंड पडलेलं असताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन वेळा तिथे गेलो. नंतर या विषयला चालना मिळाली. सध्या कोर्टाच्या आदेशाने तिथे मंदिर (tempal) उभं राहत आहेत. अयोध्येत तसेच मथुरा या मतदार संघातही आमचा उमेदवार असेल. काही लोक आमच्याकडे आले होते. मथुरेत काही प्रश्न आहेत. त्यामुळे शिवसेनेचा प्रचार मथुरा येथून व्हावा अशी काही लोकांची इच्छा आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत मी मथुरेत जाणार आहे. तेथील लोकांना भेटणार आहे,” असे संजय राऊत यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.