लखनौ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (yogi Adityanath) यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री (Cabinet minister) स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी राजीनामा (resigned) दिला. राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट (arrests warrant warrant) जारी करण्यात आले आहे. २०१४ मध्ये एक चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप (Allegations) त्यांच्यावर आहे. त्यावरुन कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान स्वामी प्रसाद मौर्य १४ जानेवारीला समाजवादी पक्षात ( Socialist Party) सामील होणार आहेत.
भाजपला धक्का दिल्यानंतर २४ तासांतच स्वामी प्रसाद मौर्य यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. दोन धर्मांत तेढ निर्माण करणारे भाषण (speech) केल्याप्रकरणी मौर्य यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पक्षांतराला जोर आला आहे. योगी सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला असून सपा, काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, योगींना (Yogi Adityanath पहिला धक्का देणारे स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरच्या एमएलए न्यायालयाने त्यांना धार्मिक भावना भडकावल्या प्रकरणी हे अटक वॉरंट जारी केलं आहे.
न्यायालयाने मौर्य यांना २४ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
२०१४ मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यात मौर्य यांनी म्हटलं होतं की, लग्नामध्ये गौरी-गणपतीची पूजा करु नये. हे मनुवादी व्यवस्थेत दलित आणि मागास वर्गाची दिशाभूल करण्याचं षडयंत्र आहे. या प्रकरणी बुधवारी स्वामी प्रसाद मौर्य हे न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे अप्पर मुख्य दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं. पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
योगी सरकारच्या (yogi sarkar) मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. मौर्य हे उत्तर प्रदेशातील ओबीसींचे (obc) मोठे नेते आहेत. पाचवेळा आमदार राहिलेल्या मौर्य यांनी २०१७ मध्ये बसपातून (bsp) बाहेर पडत भाजप (bjp) प्रवेश केला होता.
‘मी भाजपला लाथ मारलीय, १४ तारखेला बॉम्ब फोडणार’, असे सांगत येत्या काळात उत्तर प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप घडवून आणण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज वनमंत्री दारासिंह चौहान यांनी राजीनामा देत भाजपला झटका दिला.
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सपा नेते अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावरून ते समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पण, स्वामी प्रसाद यांनी सध्या मी समाजवादी पार्टीत नाही. समर्थकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील राजकीय पाऊल काय असेल हे १४ तारखेला जाहीर करेन. आपल्यासोबत आणखी काही मंत्रीही आणि आमदार (mla) आहेत, असे सांगत निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar pradesh) भाजपला आणखी मोठा धक्का देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यामार्फत भाजपने स्वामी प्रसाद मौर्य यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. केशव प्रसाद (keshav prasad) हे आपले लहान बंधू आहेत. पण गेल्या पाच वर्षांपासून त्यांची स्थितीदेखील वाईट असल्याचे स्पष्ट करत स्वामी प्रसाद (Swami prasad) यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्यास नकार दिला आहे. मुलगी संघमित्रा मौर्य ही बदायूंमधून खासदार (mp) आहे. पण भाजपमध्ये राहायचे की नाही याबाबत ती स्वतः निर्णय घेईल, असे ते म्हणाले.