Thursday, September 21, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बार्शी : कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी विशाल फटे आणि कुटुंबियांविरोधात अखेर गुन्हा दाखल

Surajya Digital by Surajya Digital
January 15, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
बार्शी : कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी विशाल फटे आणि कुटुंबियांविरोधात अखेर गुन्हा दाखल
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी ( सचिन आपसिंगकर ): गेल्या चार दिवसापासून चर्चेत असलेल्या शेअर बाजार लिंक्ड (Stock market linked) कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अखेर विशाल अंबादास फटे (Vishal Fate) आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात बार्शी शहर पोलिस (barshi city police) ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा भा.दं.वि. कलम 34, 409,417, 420 व महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic Crimes Branch) सोपविण्यात आला आहे. मुख्य आरोपी विशाल याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या कामात सहकार्य करणार्‍या दिपक बाबासाहेब अंबारे (रा. शेळके प्लॉट, गाडेगांव रोड, बार्शी) यानेच याबाबत फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा प्रारंभिक आकडा 5 कोटी 63 लाख 25 हजार असला तरी तो अब्जावधी रुपयामध्ये जाण्याची शक्यता आहे. ज्यांना आपला आर्थिक स्त्रोत  ( Financial resources) सांगण्यामध्ये अडचणी आहेत, अशा अनेक व्यक्तींनी अजूनही पोलिसांकडे रितसर तक्रार दिलेली नाही. मात्र या प्रकरणात काय होते याकडे ते लक्ष ठेवून आहेत.

विशालची पत्नी राधिका, वडिल अंबादास, आई अलका, भाऊ वैभव यांना सहअरोपी करण्यात आले आहे. तर फिर्यादीने आपली 96,25,000 रु,  भाऊ किरण बाबासाहेब अंबारे याची 50,00,000 रु, मित्र संग्राम दिलीप मोहिते याची 3,60,20,000 रु, रोहित सूर्यकांत व्हनकळस याची  35,00,000 याची, सुनिल सुरेश जानराव याची 20,00,000रु, हणुमंत सुभाष ननवरे याची 2 लाख रुपयाची फसवणूक (Cheating) केल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान फसवणुकीमुळे क्षुब्ध झालेल्या गुंतवणुकीदारांनी विशालच्या अलिपूर रस्त्यावरील घरी व उपळाई रस्त्यावरील कार्यालयात जाऊन तेथील वस्तूंची तोडफोड केली. आज शुक्रवारी दिवसभरात आणखी 36 लोकांनी दिलेल्या माहितीवरून फसवणुकीचा आकडा 11 कोटी 36 लाखावर गेला आहे. विशाल देशाबाहेर पळून जावू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर (airport) नोटीस (notice) जारी करण्यात आली आहे. तसेच त्याचे आई-वडिल-भाऊ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून ती त्याच्या मागावर आहेत. तो लवकरच पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे.  barshi : A case has been registered against Vishal Fate and his family members in a multi-crore fraud case

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

विशालचे वडिल अंबादास फटे हे येथील भगवंत प्रसाद सुलाखे वाणिज्य महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक आहेत. विशालने प्रारंभी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रस्त्यावरील मोहिते कॉम्प्लेक्समध्ये नेट कॅफे (net cafe) सुरु केले होते. तेथेच दिपकची त्याच्यासोबत ओळख झाली. प्रारंभी विशाल शेअर बाजारात ट्रेडिंग (trading) करत होता. त्याचे क्लासेस (classic) घेत होता. तेथे प्रचंड नफा होत असल्याचे तो सर्वांना सांगत असे. त्यामुळे फिर्यादी सह अनेकजण त्याच्याकडे आकर्षिले गेले.

विशालने शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी अलका शेअर्स सर्व्हिसेस, विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड, जे.एम. फायनान्शियल सर्व्हिसेस अशा कंपन्या काढल्या होत्या. त्याच्या घरातील लोकच या कंपन्यामध्ये भागीदार होते. या कंपन्याच्या वेगवेगळ्या बँकेमध्ये काढलेल्या खात्यामध्ये आणि रोख, चेकव्दारे तो लोकांकडून रकमा स्वीकारत होता. मोठा परतावा देण्याचे आमिष तो दाखवित होता. दिर्घकाळ त्याने आर्थिक देवाण घेवाण दिपकच्या खात्यातून केली. त्याचे व्यवहार जवळून बघत असल्यामुळे दिपकचा त्याच्यावर विश्वास बसल्याने त्याने आपले नातेवाईक, मित्र अशा अनेक लोकांना विशालकडे गुंतवणूक (Investment) करण्यास प्रवृत्त केले.

विशालने आकर्षक लाभाच्या वेगवेगळ्या योजना काढल्या आणि त्यात लोकांना भरमसाठ परतावाही दिला. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरील विश्वास वाढतच गेला.  नोव्हेंबर महिन्यात झी हिंदुस्थान (zee hindusthan) यांचे वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांचे हस्ते बेस्ट टेक्नॉलाजी डेव्हलपमेंट इन अल्गो ट्रेडिंग इन इंडिया (Best Technology Development in Algo Trading in India) हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळेही लोकांचा त्यावरील विश्वास वाढला. त्यातून लोकांनी मिळेल त्या मार्गाने पैसे जमवून त्याच्या हवाली केले.

10 लाखाचे वर्षानंतर 6 कोटी देण्याच्या त्याच्या योजनेने सर्वाधिक पैसे त्याने मिळविले. या योजनेतील सर्व पैसे त्याने रोख स्वरुपातच घेतले आहेत. त्याने जी.एम. फायनान्स सर्व्हिसेस (G.M. Finance Services) नावाच्या प्रस्थापित कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे येथील खाजगी बँकेत खाते उघडले होते. त्यामध्येही अनेक गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते. मात्र मूळ कंपनीला त्याचा हा उद्योग माहित झाल्यानंतर त्यानी तक्रार करुन हे खाते बंद करायला लावले होते.

गेल्या शुक्रवारी 7 जानेवारी रोजी पुणे येथील मामाला ऍटक आल्यामुळे त्यांना भेटण्यास जात आहे. असे सांगून विशालने बार्शी सोडली. त्यानंतर 9 तारखेला त्याचा मोबाईल बंद (mobile swich off) झाला. त्यानंतर त्याचा कसलाच संपर्क झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags: #case #barshi #registered #VishalFate #familymembers #multi-crore #fraud #case#बार्शी #कोट्यावधी #फसवणूकप्रकरणी #विशालफटे #कुटुंबियांविरोधात #गुन्हा
Previous Post

विनाकारण रेल्वेची साखळी ओढाल, सरकारी नोकरीला मुकाल

Next Post

चार्जर न दिल्याच्या रागातून पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, पुण्यात बिर्याणीवरून वाद

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
चार्जर न दिल्याच्या रागातून पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, पुण्यात बिर्याणीवरून वाद

चार्जर न दिल्याच्या रागातून पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, पुण्यात बिर्याणीवरून वाद

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697