पुणे : पुण्यात दोन भावंडांनी चार्जर (charger) न दिल्याच्या रागातून एका गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अमानुष मारहाण केली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विचित्र घटना घडलीय.
चंद्रकांत रामदास माने आणि सूर्यकांत रामदास माने असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावांची नावं आहेत. दोन्ही आरोपी भाऊ आंबेगाव येथील भेंडी चौक परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणी धायरी परिसरातील गारमाळ येथील रहिवासी असणाऱ्या 34 वर्षीय अंगद वसंतराव पांचाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.
आरोपींनी त्या व्यक्तीच्या कानाला चावा (bite) घेत, त्या व्यक्तीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून त्याला गंभीर जखमी केलं. या प्रकरणी पोलिसात दोन भावंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत माने आणि सूर्यकांत माने असं आरोपी भावांची नावं आहेत. तर अंगद वसंतराव पांचाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.
आरोपींनी फिर्यादी व्यक्तीच्या कानाला चावा घेत (Bite ear), त्याच्या तोंडावर जेवणातील पातळ भाजी टाकली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादी व्यक्तीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून (attack with screw driver) त्याला गंभीर जखमी केलं आहे.
दुपारी साडेचारच्या सुमारास आरोपी भावंडं फिर्यादीच्या गॅरेजमध्ये आले. त्यांनी फिर्यादीकडे मोबाइल चार्जर मागितला. पण पांचाळ यांनी चार्जर दिला नाही. चार्जर न दिल्याच्या कारणातून आरोपी भावंडांचा संताप अनावर झाला. त्यांनी शिवीगाळ करत पांचाळ यांच्याशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. फिर्यादीला मारहाण आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी संबंधित भावांनी फिर्यादीच्या पाठीला आणि कानाला जोरदार चावा घेतला. तसेच गॅरेजमधील एका जेवणाच्या डब्ब्यात ठेवलेली भाजी फिर्यादीच्या तोंडावर टाकली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन भावंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
■ बिर्याणीवरून वाद
पुण्यात बिर्याणीवरून वाद (Dispute over Biryani) झाल्याची समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
तीन जणांनी केटरिंग व्यावसायिकाला बेदम मारहाण (3 men beat catering businessman) केली आहे. आरोपींनी लोखंडी सळईने त्यांच्यावर वार (Attack with iron rod) केले आहेत. संबंधित प्रकार गुरुवारी (ता. 13) रात्री हडपसर परिसरातील बोराटे नगर याठिकाणी घडला आहे. प्रकारानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) झाला आहे.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. शुभम हनुमंत लोंढे (वय 23), ऋषिकेश समाधान कोलगे (वय 23) आणि विनायक परशुराम मुरगंडी (वय 21) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मैनुद्दीन जलील खान असं 42 वर्षीय फिर्यादीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैनुद्दीन खान याचं हडपसर परिसरातील बोराटे नगर याठिकाणी केटरिंगचा व्यवसाय आहे. येथून फिर्यादी खान बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थाचे पार्सल देतात.
दरम्यान, घटनेच्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास संबंधित तिन्ही आरोपींनी फिर्यादी खान यांच्याकडून बिर्याणी पार्सल घेतली होती. बिर्याणी घेतल्यानंतर तिन्ही आरोपी निघून जात होते. यावेळी खान यांनी आरोपींना अडवलं आणि बिर्याणीचे पैसे देण्याची विनंती केली. पण आरोपींनी बिर्याणीचे पैसे देण्याऐवजी खान यांनी शिवीगाळ आणि दमदाटी करायला सुरुवात केली.
यावर संतापलेल्या तिन्ही आरोपींनी टीका भाजण्याच्या सळईने केटरिंग व्यावसायिकाला मारहाण केली. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत भांडणं मिटवली.