मुंबई/ पुणे : नावात राष्ट्रवादी (ncp) असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काही राष्ट्रीय पक्ष (National party) ठरत नाही. तो पश्चिम महाराष्ट्रातील फक्त साडेतीन जिल्ह्यापुरता मर्यादित पक्ष आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात (political) कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना राजकारण करण्यासाठी शेवटी गल्लीतच यावं लागत, अशी बोचरी टिका करत देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस भाजपाचे गोवा निवडणूक (Goa election) प्रभारी असून राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी उत्तर प्रदेश, गोवा विधानसभा लढणार आहे. यावरून हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय राजकारणाची हवा करत भाजपावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यावर निशाणा साधताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलयं.
ते म्हणाले, शरद पवारांचा पक्ष असा आहे की पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाऊ उस जैसा (The water is like your color, like the one you mix it with). कधी ते सपाशी चर्चा करतात तर कधी काँग्रेसची, तर कधी टीएमसी सोबत. कारण राष्ट्रवादी कांही राष्ट्रीय पक्ष नाही. त्यांचे विचारही राष्ट्रीय नाहीत. नाव राष्ट्रवादी असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्रातील थोड्या भागाची पार्टी आहे. यापेक्षा मोठी नाही.
आज राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भूमिका (role) स्पष्ट केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई (Mumbai) येथे याबाबत माहिती देताना गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीसाठी पक्षाची तृणमूल काँग्रेस व काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचं सांगितलं. Being a nationalist in name
The party is not becoming national – Fadnavis Pawar
गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य (The ultimate truth) आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!’ असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी (nationalist ) काँग्रेसला टोला लगावला आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ अजित पवारांचे प्रत्युत्तर
नवीन पिढीन कोणत्याही ज्येष्ठ नेत्याविषयी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असा सल्ला अजित पवारांनी दिला. शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची उंची, विचार करण्याची क्षमता पाहता योग्य मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य (Speaking of distinctions) पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रापुरते जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचे उत्तर सडेतोडपणे देईल. आमचे वरिष्ठ देशाच्या राजकारणात बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल.
मला राजकीय जीवनात ३० वर्षे झाली. बारामतीकरांनी (baramati) मला जरी खासदार (mp) म्हणून निवडून दिले होते, पण ६ महिन्यात मी परत आलो. दिल्लीला शरद पवार यांना जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. महाराष्ट्रात मी समाधानी (In Maharashtra, I am satisfied) आहे. माझे काम चाललेले असल्याचे म्हणत अजित पवारांनी या घडामोडींवर सुरुवातीला बोलणे टाळले.
अजित पवार यांनी फडणवीस यांच्या टीकेलाही उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik), प्रफुल्ल पटेल (prafull patel) किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे (supriya sule) हे लोक फडणवीसांच्या टीकेला उत्तर देतील. शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलले पाहिजे, तारतम्य पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.