सोलापूर / करमाळा : करमाळा (Karmala) तालुक्यातील चिखलठाण येथे उजनी धरणात फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवकासह एक मच्छिमार असे दोघे बुडाले. आज त्या दोघांचे मृतदेह मिळून आले. कालच्या संक्रांत सणादिवशी (Sankranti Festival) ही दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
होडीतून फिरण्यासाठी गेलेले दोनजण उजनी जलाशयात बुडून मयत झाल्याची घटना काल शुक्रवारी (ता. १४) सकाळी घडली. अल्ताफ इकबाल शेख (वय १८ रा. मुंबई) तर समीर याकूब सय्यद (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचाही शोध सुरु होता.
समीर मासेमारी करणारा पट्टीचा पोहणारा होता. परंतु मात्र अल्ताफने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. होडीतील इतरांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूला मासेमारी करणारे मच्छिमार आले. त्यांनी शोध सुरु केला. मात्र आढळून आले नाहीत. आज सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले.
घटनास्थळ गावापासून जवळच असल्याने गावातील लोक मोठ्या प्रमाणात जमले या परिसरातील दहिगाव, चिखलठाण, केडगाव, कुगांव येथील मच्छिमार येऊन दोघांचा शोध घेत होते. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छिमारांच्या मदतीने रात्री उशीरपर्यंत शोधकार्य सुरु होते.
उजनी धरणात (Ujani Dam) फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई (Mumbai) येथील युवकासह एक मच्छिमार (Fisherman) असे दोघे बुडाले. शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. गावातील तरुण व मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली आहे. वार्ता मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.
चिखलठाण (ता. करमाळा) येथे उजनी धरणात फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवकाचा होडीतून तोल (Balance) गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मच्छीमार तरुणाने उडी मारली. बुडणाऱ्याने मच्छीमाराला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. Fishermen with youth from Mumbai
Drowned in Ujani dam, search operation started
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
येथील समीर याकूब सय्यद हा उजनी धरणात मासेमारीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे मुंबई येथील पाहुणे आले होते. सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी उजनी धरणात निघाले असताना मुंबई येथील चार पाहुणे त्याच्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले. धरणातील पाण्यात फेरफटका (Tour) मारताना अल्ताफ इकबाल शेख या युवकाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला.
त्याला वाचवण्यासाठी समीर (sameer) याने पाण्यात उडी मारली. समीर मासेमारी करणारा पट्टीचा पोहणारा होता; मात्र अल्ताफने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. होडीतील इतरांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे मच्छीमार आले. तोपर्यंत दोघे बुडाले होते. त्यातच दोघांचा मृत्यू झाला. The rescuer was drowned by the drowning man, both of them died in Karmalya
घटनास्थळ गावापासून जवळच असल्याने गावातील लोक मोठ्या प्रमाणावर जमले. या परिसरातील दहीगाव (Dahigaon), चिखलठाण (Chikhalthan), केडगाव (Kedgaon), कुगाव (Kugaon) परिसरातील मच्छीमार येऊन वडापच्या मदतीने त्यांचा शोध घेत होते. परंतु त्यांना यश आले नाही. आज यश आले.