सोलापूर : सोलापूर विजापूररोड हा मृत्यूचा सापळा झाल्याचं चित्र आहे. अनेक रस्त्यावर घडत आहेत. तसेच हत्तूरजवळील बायपास हा तर धोकादायक असल्याची चर्चा या नागरिकांमधून होत आहे. स्कॉर्पिओ (Scorpio) गाडी झाडाला धडकल्यामुळे तिघा युवकाचा मृत्यू झाला आहे.
तेरामैल औराद tera mail aurad परिसरात आज पहाटे पावणे चारच्या सुमारास सोलापुरातील तिंघाचा अपघातात मृत्यू (Death) झाला आहे. किशोर अण्णाराव भोसले (वय वर्षे 45 ) राहणार सळई मारुती, उत्तर कसबा सोलापूर), नितीन भगवान भांगे (वय 32 रा. निराळे वस्ती सोलापूर), व्यंकटेश राम म्हेत्रे (वय 45 राहणार मोदी सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. राकेश हुच्चे हा गंभीर जखमी झाल्याची माहिती information देण्यात आली आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोलापुरातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. गाडी झाडाला धडकल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. सदर घटना ही सोलापूर विजयपूर रोडवर तेरामैल औराद परिसरात घडली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विजयपूर महामार्गावरील तेरा मैल याठिकाणी पहाटे पावणे चारच्या सुमारास एम एच 13 झेड 9909 (MH 13 Z 9909) स्कॉर्पिओ Scorpio गाडीतून औराद ते सोलापूर येथे येत असताना तेरा मैल जवळ, वकील वस्ती येथे झाडाला गाडी धडकल्याने तिघेही जखमी झाले.
उपचारासाठी त्यांचा मित्र संभाजी जुगदार याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल civil hospital येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
स्कॉर्पिओ तेरामैलजवळील वकील वस्तीजवळ आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जोरात धडकली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांना पहाटे मित्र संभाजी जुगदार यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
नितीन भांगे हा मंडप कॉन्ट्रॅक्टर Pavilion Contractor असून तिघेही लाईट डेकोरेशनच्या Light decoration कामासाठी औराद परिसरात गेले होते. काम संपवून रात्री घरी परतत येत असताना अपघात झाल्याची माहिती आहे. याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.