मुंबई : देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी देवदास, डेढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी (Devdas, Dedh Ishkia, Umrao Jaan and Bajirao Mastani) यांसारख्या चित्रपटांसाठी डान्स कोरियोग्राफी (Dance choreography) केली होती. ‘मोहे रंग’ या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी त्यांना फिल्मफेयर (Filmfare) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचे नातू स्वरांश मिश्रा (Grandson Swaransh Mishra) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे (Social media posts) याबाबत माहिती दिली. पंडित बिरजू महाराज यांचं कथक नृत्यामधील योगदान फार मोलाचं आहे. दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या महाराजजींच्या वर्कशॉपला कथक कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावायचे. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वर्कशॉप workshop झालं नाही आणि आता त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
पंडीत बिरजू महाराज म्हणत, माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली होती. मात्र मला नावलौकिक आणि मानसन्मान महाराष्ट्राच्या मातीने दिला. त्यामुळे महाराष्ट्र हा माझा पिता आहे. तर बंगाल ही माझी माता आहे. Famous Kathak dancer, Padma Vibhushan
Death of Pandit Birju Maharaj
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाराष्ट्राला पिता मानणाऱ्या पंडीत बिरजू महाराज यांनी रात्री दिल्लीतील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे अखेरचा श्वास घेतला. तर बिरजू महाराज यांच्या निधनाबाबत राजकीय व कला क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे.
पद्मविभुषण पुरस्कार प्राप्त पंडीत ब्रिजमोहन मिश्रा उर्फ पंडीत बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनऊ येथे झाला. तर त्यांना संगीताची परंपरा त्यांच्या घराण्यातूनच मिळाली. त्यांनी कथ्थकसाठी कलाश्रम नावाची संस्था सुरू केली. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांची शिबीरे घेत कथ्थक विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचे काम केले. अदनान सामी यांनी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली.
Extremely saddened by the news about the passing away of Legendary Kathak Dancer- Pandit Birju Maharaj ji.
We have lost an unparalleled institution in the field of the performing arts. He has influenced many generations through his genius.
May he rest in peace.🙏🖤#BirjuMaharaj pic.twitter.com/YpJZEeuFjH— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 16, 2022
पंडीत बिरजू महाराज यांनी सत्यजीत रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाला संगीत दिले होते. तर त्यांनी देवदास. देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शनही केले होते. भारत सरकारने 1983 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तर त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड या विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट बहाल केली होती. याबरोबरच पंडीत बिरजू महाराज यांना 2002 साली लता मंगेशकर पुरस्कार यासह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या कालिदास पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याबरोबरच 2012 साली विश्वरुपम चित्रपटासाठी बिरजू महाराज यांनी राष्ट्रीय पुरस्कार तर 2016 मध्ये बाजीराव मस्तानी या चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता. त्यांना भरत मुनी पुरस्कारानेही सन्मानित केले होते.