कोल्हापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील ( N. D. paitl) (वय 93) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं त्यांना कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एन.डी. पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व Fighting leadership अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. Senior Leader Pvt. N. D. Patil dies; Mourning on Maharashtra
नारायण ज्ञानदेव पाटील उर्फ एन. डी. यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून pune University अर्थशास्त्रात एम.ए MAआणि एल.एल.बी LLB हे शिक्षण घेतलं होतं.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कष्टकरी, वंचित, कामगार, मोलकरणी Hardworking, deprived, workers, maidsअशा सर्वांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांचा जन्म ढवळी (नागाव जि. सांगली) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. सीमा लढ्याचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
□ एन. डी पाटील यांची राजकीय कारकीर्द
– 1948 : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
– 1957 : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
– 1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षं महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
– 1969-1978, 1985-2010 : शेकापचे सरचिटणीस
1978-1980 : सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य- 1985-1990 :
– महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
– 1999-2002 : निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
□ एन. डी. पाटील यांना मिळालेले सन्मान / पुरस्कार
– भाई माधवराव बागल पुरस्कार : 1994
– स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड : डी. लीट. पदवी, 1999
– राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद ) भारत सरकार : 1998 – 2000
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डी.लीट. पदवी, 2000
– विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद: 2001
– शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डी. लीट. पदवी.
□ भूषविलेले पदे
– रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
– समाजवादी प्रबोधिनी , इचलकरंजी – उपाध्यक्ष
– अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
– डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
– जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
– म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
– दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य