बार्शी / सोलापूर : शेअर स्टॉक share stock मार्केटद्वारे market अनेक नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बार्शीच्या barshi बिगबुल ठरलेल्या विशाल अंबादास फटे (Vishal Phate) याला बार्शी न्यायालयाने (Court) दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशालची दहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत police custody रवानगी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून फरार असलेला फटे काल सोमवारी मातृभक्तिमुळे (ता.17) सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला होता.
त्याला आज मंगळवारी बार्शी न्यायालयात barshi court हजर केले. कोठडी कमी मिळण्यासाठी त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला. पण न्यायालयाने फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विशाल फटे याने काल सोमवारी Monday सकाळी स्वत: एका यूट्यूब व्हिडीओतून YouTube vedio पोलिसांत हजर होण्याची कबुली दिली आणि रात्री तो पोलिसांत हजर देखील झाला. ज्यानंतर आज (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी फटेच्या वकिलांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. पण याला विरोध करत सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी पोलिसांची भक्कम बाजू मांडली. मोठा आर्थिक घोटाळा Big financial scam असल्याने विचारपूस करण्यासाठी 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशाल फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विशाल फटेचे वकील विशाल बाबर Vishal babar यांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने त्याला कमी दिवसांची कोठडी द्यावी, अशी बाजू मांडली. ते म्हणाले की, फटे हा तपासाला सहकार्य करणारा असल्याने तो स्वतःहून हजर झाला आहे. त्याने लोकांना फसवलेले नाही. फसवणूक झालेल्यांचा आकडा फुगवलेला आहे. तक्रार करणाऱ्यांनी आरोपीचा फोन phone लागत नाही अथवा तो सापडत नाही, अशी तक्रार केली आहे. मुदतीत पैसे परत दिले नाहीत, अशी फिर्याद नाही. फटे पोलीस तपासाला सहकार्य करेल, त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही , असा युक्तिवाद बाबर यांनी केला.
Big Bull giant sent to ten days police custody
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याला सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी विरोध केला. आरोपीने अनेक जणांना मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्याने परतावा दिला, पण तो देणे अशक्य झाल्यानंतर तो पळून गेला. सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीने 3 कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याने या माध्यमातून आणखी फसवणूक cheating केली आहे का? याचा तपास सुरु आहे. त्याने पैशांचे नेमके काय केले? याचा शोध होण्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे, असे सरकारी वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अखेर न्यायालयाने फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
विशाल फटे (Vishal Phate Scam) याने राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. आज चौथ्या दिवशीही फटेविरोधात तक्रारी दाखल होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 81 तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, फसवणुकीचा आकडा 25 कोटी रुपयांपर्यंत पोहचला असल्याचे माहिती information आहे. मात्र, अनेकांच्या तक्रारी अजून आलेल्या नाहीत. त्यामुळे आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
या प्रकरणी फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. फरार झाल्यानंतर तो बंगळुरु व कर्नाटकात वास्तव्यास होता. त्यानंतर हात टेकल्यानंतर तसेच आईच्या अटकेच्या भीतीने तो काल पोलिसासमोर हजर झाला. साध्या रिक्षात riksha येवून त्याने पोलिसाना आपण विशाल फटे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अटक केली.