मुंबई : आपली ताकद वाढली असून आपण पंतप्रधान मोदी pm modi यांना मारू ही शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले. त्याबाबत स्पष्टीकरण देताना पटोले म्हणाले की, ‘जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे. लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल तक्रार केली होती. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही’.
या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण political काही प्रमाणात तापले होते. दिवसभर भाजपने आक्रमक होत टीकेची झोड उठवली. आपली चूक लक्षात येताच नाना पटोलेंनी घूमजाव केला आहे.
नाना पटोले यांच्या विरोधात भंडाऱ्यात bhandhara गुन्हा देखील दाखल झाला आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याप्रकरणी नाशिकच्या nashik सरकारवाडा पोलीस ठाण्यात sarkarwada police thane तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस opposition party leader Devendra fadanvis यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील State President Chandrakat Patil यांनी देखील पटोलेंवर टीका केली. त्यानंतर अखेर नाना पटोलेंनी आपल्या त्या वक्तव्यावर घुमजाव होत स्पष्टोक्ती दिली आहे. आपण कोणत्याही प्रकारचे मोदींविरोधात भाष्य केले नसल्याचे म्हणत पटोलेंनी आपल्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. Nana Patole’s tour; I talked about a gangster named Modi in the village, not about the PM ‘
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नाना पटोले म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द Swearing वापरले नाहीत. मी आमच्या भागातील मोदी असे टोपण नाव असणाऱ्या गावगुंडावर बोललो आहे. त्यामुळे यामध्ये पंतप्रधान मोदींचा विषयच येत नसल्याचे नाना पटोलेंनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक arrested करावी, अशी विनंती नितीन गडकरी nitin gadkari यांनी केली आहे. नाना पटोले यांनी वापरलेली भाषा निंदनीय असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पटोलेंच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस bjp & congress यांच्यात राजकीय वातावरण political atmosphere तापण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी Sunday संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले होते.