सोलापूर : माढा, माळशिरस, श्रीपुर- महाळुंग, नातेपुते आणि वैराग Madha, Malshiras, Sripur- Mahalung, Natepute and Vairag या पाच नगरपंचायती मधील १९ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले असून एकूण सरासरी ८१.२३ टक्के मतदान voting झाले आहे. या १९ जागांसाठी एकूण १२ हजार ९१० मतदारांनी मतदान केले. उद्या बुधवारी Wednesday (ता. १९) मतमोजणीस सुरवात होणार आहे
माळशिरस malshiras नगरपंचायतीमधील चार पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने तीन जागांसाठी आज मंगळवारी मतदान झाले. १९ जागांसाठी एकूण ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण १७ हजार १९१ मतदार होते. यापैकी ६ हजार ७२८ पुरुष मतदार तर सहा हजार १८१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यासोबत नातेपुते natepute येथील एका तृतीयपंथी मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.
ओबीसी आरक्षण obc reservations रद्द झाल्यानंतर या पाच नगरपंचायतमधील ओबीसीच्या २० जागांवरील निवडणूक रद्द झाली होती. त्यानंतर २० जागा खुल्या प्रवर्गातून नियोजित झाल्या. २० पैकी दहा जागा महिला खुला प्रवर्ग तसेच इतर दहा जागा सर्वसाधारण प्रवर्गसाठी होत्या
● मतदानाची टक्केवारी अशी
माढा : ८०.८ टक्के, माळशिरस : ८५.८ टक्के श्रीपुर- म्हाळुंग -७८.१५ टक्के वैराग- ८१.८८ टक्के नातेपुते -८१.८१ टक्के
81% turnout for 19 seats in five Nagar Panchayats in Solapur, counting of votes tomorrow
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ वैराग नगरपंचायतींसाठी ८१ .८८ टक्के मतदान
बार्शी : एकूण १७ प्रभाग असलेल्या वैराग नगरपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यातील चार प्रभागांची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील तेरा जागांसाठी २१ डिसेंबर रोजी ७७ % मतदान झाले आहे. तर काल उर्वरीत चार जागांसाठी ८१.८८% मतदान झाले. उद्या बुधवारी एकूण सतरा जागांची एकत्रित मोजणी वैरागमध्येच होणार असून ,पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वैराग नगरपंचायतीची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये झाली. पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या उत्साहात मतदान झाले असले तरी दुसरा टप्पा निर्णायक असल्यामुळे चुरशीने ८१.८८ % मतदान पार पडले.
मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि सुवर्णलता वरिष्ठ महाविद्यालय या चार केंद्रांवर ती चार प्रभागांचे मतदान घेण्यात आले. सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक दहा मध्ये ८९.५३ % झाले असून सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक तीन मध्ये ७८.१२ % झाले आहे .
प्रभाग क्रमांक तीन मध्ये १०७४ पैकी ८३९ एवढे ( ७८.१२ % ) मतदान झाले. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ११३१ पैकी ९२४ ( ८१.७० % ) , प्रभाग क्रमांक १० मध्ये ७८३ पैकी ७०१ ( ८९.५३ % ) , प्रभाग क्रमांक १५मध्ये ६७० पैकी ५३१ ( ७९.२५ % )अशाप्रकारे चार प्रभागातील एकूण ३ हजार ६५८ पैकी २ हजार ९९५ मतदान एकूण ( ८१.८८ % ) झाले. यापूर्वीच्या १३ प्रभागातील मतपेट्या नगरपंचायत मध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. या चार प्रभागातील मतपेट्या तेथेच ठेवण्यात आल्या असून उद्या बुधवारी सकाळी आठ पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
□ नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत २५९३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
नातेपुते : नातेपुते नगरपंचायत उर्वरित चार प्रभागासाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. यामध्ये ७, ८, ९, १० प्रभागामध्ये निवडणुकीचे मतदान झाले. ४ प्रभाग जागेसाठी एकूण ३१८० मतदान आहे. त्यापैकी २५९३ पुरुष ,स्त्री व इतर १ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी सुरुवातीपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांची मतदान बुथ वर गर्दी सुरू होती. उमेदवार व कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने करून घेता येईल याकडे लक्ष देत होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी मतदान केंद्रांच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. तसेच पेट्रोलिंगसाठी दोन पोलीस वाहने ठेवण्यात आली होती. उद्या बुधवारी ऐतिहासिक नगरपंचायतीच्या १७ प्रभाग जागेचा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
१७ प्रभाग जागेसाठी ७२ उमेदवार निवडणुकीत उभा राहिले होते. नातपुते नगरपंचायत येथे निकाल जाहीर केला जाणार असून नव्याने स्थापित होणाऱ्या इतिहासिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागणार व ऐतिहासिक नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष कोण असणार याकडे नातेपुते व नातपते परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.