सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील ५ नगर पंचायतीसाठी काल मतदान संपलं. पूर्वीच ओबीसी वगळता इतर मतदारसंघात मतदान झालं आहे. काल प्रत्येकी ४ जागांसाठी मतदान झालं आहे. एकूण ८५ जागा आहेत. निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. या सर्व नगरपंचायतीत प्रथमच मतदान झालं आहे.
वैराग नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली १३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने पूर्ण बहुमत प्राप्त केले असून भारतीय जनता पक्षाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा निकाल आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपलांना चांगलाच दणका समजला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून यामध्ये माढा नगरपंचायतीवर काँग्रेस, वैरागमध्ये राष्ट्रवादी, माळशिरसमध्ये भाजप, श्रीपूरमध्ये मोहिते पाटील यांची स्थानिक आघाडी, तर नातेपूते नगरपंचायतीवर मोहिते पाटील पुरस्कृत स्थानिक आघाडीने सत्ता मिळविली आहे. सोलापूर जिल्ह्यात एकंदरीत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचे दिसतय .
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपला १०, राष्ट्रवादी काँग्रेसला २, महाविकास आघाडीला २, अपक्ष ३ जागांवर यश मिळाले आहे. भाजप – १०
राष्ट्रवादी – २,मा वि आ – २ अपक्ष – ३ एकूण १७ जागेचा निकाल लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपला १०, राष्ट्रवादी काँग्रेसला २, महाविकास आघाडीला २, अपक्ष ३ जागांवर यश मिळाले आहे.
श्रीपूर-महाळुंग या नगरपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीतील मुंडफणे आणि रेडे पाटील गटाला ९ जागा, तर राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी ही माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील समर्थकांनाच सत्ता मिळाली आहे. Malshiras flew to BJP, Madha to Congress and NCP’s flag to Vairag
□ माळशिरसचे विजयी उमेदवार
प्रभाग १ – कैलास वामन (मविआ)
प्रभाग २ – ताई वावरे (अपक्ष) बिनविरोध
प्रभाग ३ -पुनम वळकुंदे (अपक्ष)
प्रभाग ४- विजय देशमुख (भाजप)
प्रभाग ५ -शोभा धाईजे (भाजप)
प्रभाग ६ – आबा धाईंजे (भाजप)
प्रभाग ७- आप्पासाहेब देशमुख (भाजप)
प्रभाग ८ – कोमल जानकर ( भाजप )
प्रभाग ९ -राणी शिंदे ( भाजप )
प्रभाग १०- अर्चना देशमुख ( भाजपा )
प्रभाग ११ रेष्मा टेळे (मविआ)
प्रभाग १२-प्राजक्ता ओवाळ ( भाजप )
प्रभाग १३ -शिवाजी देशमुख ( राष्ट्रवादी )
प्रभाग १४- मंगल गेजगे ( अपक्ष )
प्रभाग १५- मंगल केमकर ( भाजप )
प्रभाग १६ पुष्पावती कोळेकर (भाजप)
प्रभाग १७ रघुनाथ चव्हाण (राष्ट्रवादी)
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ माढ्यावर काँग्रेसची सत्ता, एकाच प्रभागातून पती – पत्नी विजयी
माढा नगरनगरपंचायतीत १७ जागजागांपैकी १२ जागा माजी आ. धनाजी साठे अर्थात काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
माढा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १२ जागा माजी आ. धनाजी साठे अर्थात काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
प्रभाग क्रमांक एकमधून आजिनाथ भागवत राऊत व सुनिता अजिनाथ राऊत हे पती – पत्नी निवडणुकीत विजयी झाले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे व माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजारनाना भांगे यांचे सुपुत्र आदित्य भांगे यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून विकास कामाच्या जोरावर काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे.
माजी नगराध्यक्ष मीनल साठे माजी सभापती कल्पना जगदाळे माजी विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे माजी नगरसेविका संजीवनी भांगे अनिता चवरे या निवडणुकीत विजयी झाल्या असून माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांच्या पत्नी अर्चना कानडे या विजयी झाल्याने शहरातील प्रमुख नेते मंडळीचा या नगरपंचायतीमध्ये सहभाग पाहायला मिळणार आहेत. माजी नगरसेविका राणूबाई गाडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
□ वैरागवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
साम-दाम-दंड-भेद याला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांची वैराग नगरपंचायत वर एक हाती सत्ता आली आहे. वैराग नगरपंचायतीमध्ये १७ पैकी १३ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. तर भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी आ. राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांना डावलून स्थानिक नेते निरंजन भूमकर यांना मतदारांनी कौल दिला आहे.
वैराग नगरपंचायतच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरंजन भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस १७ जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपचे सहयोगी सदस्य आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे १७ जागेवर उमेदवार उभे केले होते. शिवसेना आणि काँग्रेस आघाडी यांनी मिळून १५ जागेवर उमेदवार उभे केले होते. तर दोन अपक्षाला पुरस्कृत केले होते.
प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल अशोक मोहिते ३४८ मते घेऊन विजयी झाले. याच प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे मधुकर कापसे व शिवसेनेचे अरुण सामंत हे पराभूत झाले.
प्रभाग क्रमांक २ मधून बार्शी तालुका पंचायत समिती सदस्य तथा उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर राष्ट्रवादी काँग्रेस ३६२ मते मिळवून विजयी झाले. अपक्ष विकास मगर व भाजपचे दत्तात्रय क्षीरसागर हे पराभूत झाले.
प्रभाग क्रमांक-३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तृप्ती निरंजन भूमकर ६८४ मते घेऊन विजयी झाल्या. भाजपच्या जाहिरा शेख व शिवसेनेच्या मुमताज शेख पराभूत झाल्या .
प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुप्रिया आनंद घोटकर या २३९ मते घेऊन विजयी झाल्या.
भाजपच्या शोभा पाचभाई व शिवसेनेच्या कविता सोपल या पराभूत झाल्या.
प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुरु बाई संजय झाडमुखे या ३९६ मते घेऊन विजयी झाल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना-काँग्रेसच्या उमेदवार तेजस्विनी मरोड व भाजपच्या रेश्मा शिंदे या पराभूत झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसमान नयुम मिर्झा यात ३३८ मध्ये घेऊन विजयी झाल्या. भाजपच्या मनीषा तावस्कर व काँग्रेसच्या मुमताज पठाण या पराभूत झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदमीन अप्पाराव सुरवसे या २२४ मते घेऊन विजयी झाल्या. तर भाजपच्या साधना गांधी व शिवसेनेच्या कुसुम वरदाने या पराभूत झाल्या.
प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपच्या राणी वैजिनाथ आदमाने या ३९३ मते घेऊन विजय झाल्या. तर राष्ट्रवादीच्या कविता खेदाड व माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर यांच्या पत्नी तथा अपक्ष उमेदवार सुप्रिया निंबाळकर या पराभूत झाल्या.
प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जैतुनबी गफूर बागवान या ३७० मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे उमेदवार मकरंद निंबाळकर व भाजपाचे दीपक माने हे पराभूत झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नागनाथ वाघ ४२४ मते घेऊन विजयी झाले. या प्रभागातून भाजपाचे आप्पासो खेंदाड व शिवसेनेचे सतीश खेंदाड हे पराभूत झाले.
प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपचे श्रीशैल्य मच्छिंद्र भालशंकर हे २१९ मते घेऊन विजयी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा ठोंबरे व शिवसेनेचे आकाश काळे हे पराभूत झाले आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय विठ्ठल साठे हे ३१८ मध्ये घेऊन विजयी झाले. भाजपचे दिलीप गांधी व शिवसेनेचे दादासाहेब मोरे हे पराभूत झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा माजी सरपंच सुजता संगमेश्वर डोळसे या २८५ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या रसिका लोंढे व शिवसेनेच्या संध्याराणी आहिरे या पराभूत झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजयकुमार शिवाजी काळोखे हे १७८ मध्ये घेऊन विजयी झाले आहेत तर भाजपचे विनोद चव्हाण व शिवसेनेचे किशोर देशमुख ते पराभूत झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री खंडेराया घोडके या ३४७ मते घेऊन विजयी झाल्या. शिवसेनेच्या शोभा पांढरमिसे व भाजपच्या जयश्री सातपुते या पराभूत झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपच्या अर्चना बाबासाहेब माने – रेडी या २८६ मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा मगर व शिवसेनेच्या शुभांगी पांढरमिसे या पराभूत झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १७ मधून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर यांचे चिरंजीव भाजपचे शाहूराजे संतोष निंबाळकर हे ३३३ मते घेऊन विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक खेंदाड व शिवसेनेचे रवींद्र पवार हे पराभूत झाले आहेत .