अकलूज : माळशिरस Malshiras तालुक्यातील नातेपुते natepote माळशिरस आणि महाळुंग श्रीपुर या नगरपंचायतीवर मोहिते-पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे आज शिवरत्न बंगला shivratn bangla अकलूज akluj येथे विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस, महाळूंग श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुका election झाल्या. या अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. या निवडणुकांमध्ये अतिशय चुरस निर्माण झाली होती. यामध्ये मोहिते-पाटील यांच्या उमेदवार बाजी मारण्यात यशस्वी success झालेले आहेत. या झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने Nationalist Congress सत्ता स्थापनेचा दावा केला होता, मात्र तो फोल ठरला आहे. मोहिते-पाटील यांची जादू कायम The magic lasts असल्याचे चित्र स्पष्ट झालेले दिसत आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नातेपुते, माळशिरस, महाळुंग श्रीपुर Natepute, Malshiras, Mahalung Sripur मधील भाजपा आणि पुरस्कृत आघाड्यातील विजयी नगरसेवकांनी शिवरत्नवर येवून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील Former Deputy Chief Minister Vijay Singh Mohite-Patil यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे Sahakar Maharshi Shankarrao Mohite Patil Sahakari Sugar Factories चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. Mohite Patil dominates Nagar Panchayats in Malshiras
यावेळी नूतन नगरसेवक व मान्यवर मंडळींचा सन्मान करण्यात आला. माळशिरस तालुक्यात ३८ नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद भक्कम झालेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेपूर ताकद लावली असली तरी त्यांना यश संपादन करता आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांचाच करिष्मा Charisma पाहायला मिळाला. माळशिरस तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांना स्पष्टपणे कौल Clearly Kaul दिला आहे.
“माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढविली, यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे घवघवीत यश संपादन केले.”
– धैर्यशील मोहिते पाटील
संघटन सरचिटणीस,भाजपा