पुणे : पिंपरी चिंचवडमधील वडमुखवाडी येथे मध्य प्रदेशातून बेकायदेशीरित्या पिस्तुलाची विक्रीसाठी आलेल्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने Anti-robbery squad अटक केली. त्यांच्याकडील विक्रीसाठी आणलेले 14 पिस्टल आणि 8 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.
आकाश अनिल मिसाळ (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय 30, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय 26, रा. सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता (वय 28, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी चिंचवडमधील pinpari Chinchwad वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी तिथे सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. यातील एका आरोपीकडून यापूर्वी देखील 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती. आकाश अनिल मिसाळ , रुपेश सुरेश पाटील, ऋतिक दिलीप तापकीर, अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन mobile phone, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपी हे पिस्तुलांची विक्री करण्याबरोबरच पेट्रोल पंपावर petrol pump दरोडा टाकण्याच्या तयारीने आले होते. त्यांच्याजवळ दरोड्यासाठी आवश्यक असलेली साहित्यही पोलिसांनी आढळून आले आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने दरोड्याची घटना टाळली आहे. अटक करून आरोपीना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. Pimpri Chinchwad: 14 pistols brought for sale from Madhya Pradesh seized
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गुन्ह्यात आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या फ्लॅटमधून सहा गावठी कट्टे (पिस्टल) आणि जिवंत काडतूस मिळाले. तर आकाश मिसाळ याच्या घरातून चार गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला.
आरोपी रुपेश पाटील आणि अक्षय मिसाळ हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रुपेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रुपेश पाटील आणि टोळीकडून 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर देखील तो सुधारला नाही. त्याने पुन्हा मध्य प्रदेशातून पिस्टल आणून शहरात विकण्याचा काळा बाजार चालू केला. यामुळे त्याला पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागली आहे.
रुपेश पाटील rupesh patil भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस bhosari police ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश Commissioner of Police Krishna Prakash, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, नागेश माळी, पोलीस हवालदार शेटे यांच्या पथकाने केली आहे.