बँकॉक : थायलंडमधील एका तरुणाला पार्टीसाठी चक्क कोरोना पॉझिटिव्ह तरुणी हवी आहे, कारण त्याला कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) व्हायचे आहे. अशा तरुणीला तर तो पैसेही द्यायला तयार आहे. याच कारण थायलँडमधील इन्शूरन्स कंपन्या कोरोनाला आपल्या प्लॅनमध्ये समाविष्ट करत आहे. जर एखादी व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडली तर त्या व्यक्तीला 4 लाख रुपये दिले जातील. त्यामुळे तेथील अनेक लोक स्वतःहून कोरोनाबाधित होत आहेत.
कोरोनाव्हायरस ज्याची भीती अनेकांना वाटते. त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये, म्हणून लोक काळजी घेत आहेत, उपाय करत आहेत. कोरोना संसर्ग झालेल्या लोकांपासून दूर राहत आहेत. याउलट थायलँडमध्ये (Thailand ) राहणारी ही व्यक्ती मात्र मुद्दामहून कोरोनाची लागण झालेलीच तरुणी शोधत आहे. या व्यक्तीने तशी जाहिरातही advertised दिली आहे आणि यासाठी दलालाचीही मदत घेतली आहे. या व्यक्तीला कोरोनाग्रस्त महिलेसोबत पार्टी करायची आहे, आणि याचं कारण म्हणजे त्याला कोरोना पॉझिटिव्ह व्हायचं आहे. आपल्याला कोणत्याही रोमँटिक रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही आहे.
फक्त एका पार्टीत party कोरोना पॉझिटिव्ह करणारी तरुणी हवी आहे, असं या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार या व्यक्तीने कायदेशीर ब्रोकरची मदत घेतली आहे जेणेकरून त्याला आपल्या कामासाठी परफेक्ट महिला भेटेल. महिलेला आपली अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह Antigen test positive असल्याचं दाखवावं लागेल.
त्यानंतर त्या तरुणालाही पॉझिटिव्ह करायचं आहे. या कामासाठी ही व्यक्ती त्या महिलेला £66 ते £110 म्हणजे जवळपास 11 हजार रुपये ऑफर केले आहेत. तसंच तो 1300 रुपये ब्रोकरेजही देत आहे. या विचित्र मागणीमुळे या व्यक्तीचा मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
थायलँडच्या स्थानिक मीडियाने या व्यक्तीच्या या विचित्र जाहिरातीमागील कारणही सांगितलं. थायलँडमधील इन्शूरन्स कंपन्या कोरोनाला आपल्या प्लॅनमध्ये समाविष्ट करत आहे. जर एखादी व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडली तर त्या व्यक्तीला 4 लाख रुपये दिले जातील. सुरुवातीला इन्शूरन्स कंपन्या याबाबत फार माहिती घेत नसत पण आता अधिकारी रुग्णाला स्वतः पाहतात त्यामुळे लोकांना स्वतःहून कोरोना इन्फेक्टेड व्हायरसचं आहे. थायलँडमध्ये बरेच लोक कोरोनाग्रस्त होण्याचे मार्गही सांगत आहेत. I want a corona positive young woman, willing to pay, strange demand
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ कोरोना पॉझिटिव्ह आई बाबासह स्वतःही पिते आपलेच दूध
लंडन : कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर आपल्या मुलांना दूध milk पाजावं की नाही, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. असं असताना एक कोरोना पॉझिटिव्ह आई mother मात्र फक्त आपल्या मुलीला आपलं दूध पाजत नाही तर ती स्वतःही आपलं ब्रेस्टमिल्क पिते आहे. (Corona positive mother drink her own milk)
अश्मिरी (Ashmiry) असं या महिलेचं नाव आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिने आपला अनुभव सोशल मीडियावर social midea मांडला आहे. कोरोना झाल्यानंतर त्याचे शरीरावर बरेच परिणाम दिसून येतात. बहुतेकांना कोरोनाचे दुष्परिणामच दिसून आले आहेत. पण या महिलेला मात्र कोरोनाचा चांगला परिणाम दिसून आला आहे. अश्मिरीला दोन मुलांची आई आहे.
तिची लहान मुलगी अजूनही ब्रेस्टफिडिंगवर (Breastmilk) आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिनं तिच्यासाठी मिल्क पंप केलं तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या दुधाचा रंग बदलला होता. एरवी क्रिमी पांढऱ्या रंगाचं असणारं दूध हिरव्या रंगाचं झालं होतं. दुधाचा रंग milk colour असा अचानक बदलल्याने तीसुद्धा घाबरली.
तज्ज्ञांच्या मते, खरंतर कोरोनामुळे ब्रेस्टमिल्कचा बदलेला रंग म्हणजे हे दूध पहिल्यापेक्षा अधिक पौष्टिक आणि इम्युनिटी वाढवणारं झालं. हे दूध आपल्या कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आजाराशी लढण्यासाठी ताकद देईल. तसंच त्याचे इतके फायदे benefits पाहून तिनेसुद्धा आपलं ब्रेस्टमिल्क प्यायल्याचं तिने सांगितलं, असं वृत्त द सनने दिलं आहे.