सोलापूर – शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी (ता. 21) दुपारच्या सुमारास पाथरी Pathari (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. या घटनेची माहिती information मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे Solapur Taluka Police पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेने पाथरी गावावर शोककळा Mourning पसरली आहे. याच महिन्यात मार्डीत mardi अशीच घटना घडली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कैलास गुंड याच्या शेततळ्यात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात सारिका अक्षय ढेकळे (वय 22 ), हे आई गौरी अक्षय ढेकळे (वय ५) आरोही अक्षय ढेकळे (वय २) असे मुलींचे नावे आहेत. आईने आपल्या दोन मुलींसह आत्महत्या sucide केल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मयत सारिका यांच्या नणंदेचे हे शेत आहे. अक्षय ढेकळे यांचेही शेत शेजारीच आहे. त्यांची द्राक्षाची बाग आहे. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास शेततळ्यात यांचा मृतदेह deadbody आढळून आला. यामध्ये सारिका ढेकळे यांनी त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली गौरी आणि आरोही यांचा समावेश होता.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक police inspector दाखल झाले. त्यांनी त्वरित हे तिन्ही मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे मृतदेह पाठवून दिले. अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव हे घटनास्थळी दाखल होत आहेत.
एका महिन्याभरात अशी दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावामध्ये शेततळ्यामध्ये तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला होता. पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून ही घटना घडली होती. एकमेकाला वाचवताना तिघांचा मृत्यू झाला होता .