ढाका – बांग्लादेशी अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू Bangladeshi actress Raima Islam Shimu हिचा मृतदेह पोत्यात बंद केलेल्या अवस्थेत सापडला होता. आता रायमाच्या पतीनेच अभिनेत्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. राइमाचा पती शखावत अली नोबेल Shakhawat Ali Nobel याने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
बांग्लादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू ही 45 वर्षांची होती. 1998 मध्ये बार्तामन Bartaman या सिनेमातून तिने करिअरला सुरुवात केली. आतापर्यंत तिने एकूण 25 सिनेमांमधून काम केले होते.रायमाने बांग्लादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनची Bangladesh Film Artists Association सदस्या देखील होती. सिनेमांप्रमाणेच अनेक टीव्ही शो आणि नाटकाही तिने कामे केली होती.
या हत्येत शखावतचा मित्र एसएम वाय फरहाद SM Y Farhad या देखील मदत केली आहे. पोलिसांनी सांगितले की, नोबेलने शिमूची हत्या केली, तर फरहादने त्याला मृतदेह लपविण्यास मदत केली. एका मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या करुन मृतदेह लपवल्याचं राइमा यांच्या पतीने म्हटलंय. मात्र या प्रकरणामध्ये पतीला अटक arrested करण्याचा निर्णय केवळ एका दोऱ्याच्या बंडलमुळे घेतल्याची माहिती समोर येतेय. घरगुती वादामधून राइमा यांची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक केली.
राइमा यांचा मृतदेह गोणीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस तपासासाठी घरी पोहचले. पोलिसांनी घरी जाऊन तपास सुरु केला असता त्यांना राइमाचे पती शेखावत अली यांच्या गाडीमध्ये एक प्लास्टिकच्या दोरीचा बंडल मिळाला.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गाडीमध्ये जो दोरीचा बंडल मिळाला त्याच पद्धतीच्या दोरीचा वापर दोन गोण्यांमध्ये मृतदेह टाकून त्या शिवण्यासाठी केल्याचं उघड झालं आणि पतीच आरोपी असल्याचा शंका पोलिसांना आली.The murder of the actress was hatched by the husband himself
हत्या केल्याचे पुरावे लपवण्यासाठी राइमाच्या पतीने गाडी पाण्याने धुतली होती. तसेच दुर्गंध येऊ नये म्हणून ब्लीचिंग पावडर वापरण्यात आली होती. पोलिसांनी एका दोऱ्याच्या बंडलच्या आधारे पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. तसेच यात एका मित्राने मदत केल्याचा खुलासा शेखावतने केल्यानंतर अन्य एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली.
बांगलादेशमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 16 जानेवारी रोजी राइमा यांची हत्या करण्यात आली. 17 जानेवारी रोजी काही स्थानिक लोकांनी कदमटोली येथील अलीपुर ब्रिज Alipore Bridge जवळ पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. राइमा हिचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी Sunday राइमाची हत्या झाल्यानंतर तिला पोत्यात कोंबून पुलावरुन फेकून दिले.
पोलिसांना शखावत अलीच्या संशायस्पद हालचाली आणि देहबोलीवरुन त्याच्यावर संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने चौकशीअंती मीच पत्नी राइमाचा खून केल्याचे कबूल केले. घरगुती भांडाणांमुळे मी असे केल्याचे त्याने सांगितले. ढाकाच्या वरिष्ठ न्यायदंडाधिकारी राबेया बेगम Senior Magistrate Rabeya Begum यांनी राइमाचा पती शखावत अली आणि त्याच्या ड्रायव्हर मित्राला चौकशीसाठी तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. राइमा यांचा मृतदेह लपवण्यासाठी त्यांच्या नवऱ्याने एका मित्राची मदत घेतल्याचं ढाका पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालंय.