मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ncp अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. ‘अमोल कोल्हेंनी कलावंत Artist म्हणून नथुराम गोडसेची Nathuram ghodase भूमिका role केलेली आहे. भूमिकेमुळं ते लगेच गांधीविरोधी ठरत नाहीत, असं शरद पवार म्हणाले. तसेच भाजपकडून bjp याविषयी टीका होत असेल तर भाजपनं ते गांधीवादी From BJP to Gandhian कधीपासून झाले हे आधी सांगावं, असंही पवार म्हणाले. दरम्यान, जयंत पाटील jayant patil यांनीही अमोल कोल्हे यांची पाठराखण केली.
‘व्हाय आय किल्ड गांधी’ Why I killed Gandhi या सिनेमात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरून वाद सुरू असून राष्ट्रवादीत दोन गट two group पडलेले असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे.
नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा cenima निघत असेल तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड jitendra awad यांनी भूमिका मांडली आहे असेही जयंत पाटील म्हणाले. हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिकाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदरची भूमिका अमोल कोल्हे यांनी केली आहे. मात्र त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहित नाही असेही जयंत पाटील म्हणाले. MP Amol Kolhe’s backing from Sharad Pawar, but Congress is aggressive
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे त्यामुळे नोटीस notice काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची रोखठोक भूमिका Cash role माध्यमांशी बोलताना मांडली.
या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी २०१७ साली ती भूमिका केली आहे. राष्ट्रवादीत ते त्यानंतर आले आणि लोकसभेची निवडणूक जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करुन ते घराघरात पोचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर Shahu, Phule, Ambedkar यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
□ काँग्रेस मात्र आक्रमक
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका एका चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे.
चित्रपटाबाबत काँग्रेसनेही आक्रमक भूमिका Congress also played an aggressive role घेतली आहे. कोल्हे हे एक लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेला हिरो बनवण्याचे काम करु नये. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित in maharashtra relise होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांनी दिला आहे.
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते फक्त कलाकार नाहीत. नथुराम गोडसेच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघातक व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्षात घेवून यामध्ये लक्ष घालावे.
चित्रपटाच्या माध्यमातून नथुराम गोडसे सारख्या प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचे आहे. या देशाला फक्त महत्वा गांधींचाचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता World superpower होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेले आहे, असे पटोले यांनी सांगितले.