सोलापूर : जिल्हा सहकारी दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून अर्ज दाखल करण्याची मुदत २८ जानेवारीपर्यंत आहे. बचाव कृती समिती पॅनल उभं करून ही निवडणूक लढवणार असल्याचे आज जाहीर केले. सोमवारी बचाव समितीचा पॅनल जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
संचालक मंडळातील १७ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार असून खुल्या प्रवर्गातील बारा, राखीव प्रवर्गातील पाच सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी ठेवण्यात आली आहे. माळशिरस तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुके दूध संघाच्या कार्यक्षेत्रात आहेत. या तालुक्यामधून खुल्या गड प्रवर्गातून १२ संचालक निवडले जाणार आहेत तर महिला सदस्यासाठी दोन जागा राखीव आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उर्वरित तीन जागा या अनुसूचित जाती-जमाती मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. District Milk Association election announced; The Rescue Action Committee will set up the panel
□ दूध संघ निवडणूक – बचाव कृती समिती पॅनल उभं करणार
सोलापूर – सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक दूध उत्पादक संघ बचाव कृती समिती पॅनल करून लढवणार आहेत अशी माहिती information आज पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल अवताडे anil यांनी दिली.
सद्यस्थितीत दूध milk संघाला १०४ कोटी रुपयांचा तोटा आहे. तीस कोटी रुपये कर्ज झाले, याला विद्यमान तसेच माजी संचालक जबाबदार आहेत असा आरोप आज पत्रकार परिषदेत करण्यात आला.
संघाचे दैनंदिन दूध संकलन ४ लाख लिटर वरून २५ हजार लिटर इतकं कमी झालं आहे. भ्रष्ट साखळीमुळे दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू आहे असा आरोपही करण्यात आला.
आजी – माजी आमदार mla यांच्यासह मातब्बर पुढारी यांच्याकडे दूध संघ असताना तो कर्जबाजारी झाला कसा ? दूध संघाची स्थावर ही स्वतःची असल्याप्रमाणे निर्णय घेणाऱ्या संचालकांना आवर घातला पाहिजे.
बचाव कृती समिती स्थापन झाल्यापासून भ्रष्ट कर्मचार्यांकडून ३६ लाखाची वसुली केली गेली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांना कृती समितीने पाठपुरावा करून बडतर्फ करायला लावलं.
त्यांच्यावर फौजदारी गुन्हा crime दाखल आहे. दुधाची बिल आता दर दहा दिवसाला दिली जातात. जिल्हा दूध संघाचे प्रशासकीय मंडळ हटवून खासगी प्रशासक नेमण्यात बचाव समितीने विरोध केला. तालुका संघ निर्मितीसही विरोध केला आहे असेही अनिल अवताडे म्हणाले. येत्या सोमवारी बचाव समितीचा पॅनल जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले जातील असेही सांगण्यात आलं. यावेळेस भाऊसाहेब धावणे, दत्तात्रय राजगुरू यांची उपस्थिती होती.