Sunday, August 14, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर; बचाव कृती समिती पॅनल उभं करणार

Surajya Digital by Surajya Digital
January 22, 2022
in Hot News, सोलापूर
2
जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर; बचाव कृती समिती पॅनल उभं करणार
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा सहकारी दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून अर्ज दाखल करण्याची मुदत २८ जानेवारीपर्यंत आहे. बचाव कृती समिती पॅनल उभं करून ही निवडणूक लढवणार असल्याचे आज जाहीर केले. सोमवारी बचाव समितीचा पॅनल जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

संचालक मंडळातील १७ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार असून खुल्या प्रवर्गातील बारा, राखीव प्रवर्गातील पाच सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी ठेवण्यात आली आहे. माळशिरस तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुके दूध संघाच्या कार्यक्षेत्रात आहेत. या तालुक्यामधून खुल्या गड प्रवर्गातून १२ संचालक निवडले जाणार आहेत तर महिला सदस्यासाठी दोन जागा राखीव आहेत.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

उर्वरित तीन जागा या अनुसूचित जाती-जमाती मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. District Milk Association election announced; The Rescue Action Committee will set up the panel

□ दूध संघ निवडणूक – बचाव कृती समिती पॅनल उभं करणार

सोलापूर – सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक दूध उत्पादक संघ बचाव कृती समिती पॅनल करून लढवणार आहेत अशी माहिती information आज पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल अवताडे anil यांनी दिली.

सद्यस्थितीत दूध milk संघाला १०४ कोटी रुपयांचा तोटा आहे. तीस कोटी रुपये कर्ज झाले, याला विद्यमान तसेच माजी संचालक जबाबदार आहेत असा आरोप आज पत्रकार परिषदेत करण्यात आला.

संघाचे दैनंदिन दूध संकलन ४ लाख लिटर वरून २५ हजार लिटर इतकं कमी झालं आहे. भ्रष्ट साखळीमुळे दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू आहे असा आरोपही करण्यात आला.

आजी – माजी आमदार mla यांच्यासह मातब्बर पुढारी यांच्याकडे दूध संघ असताना तो कर्जबाजारी झाला कसा ? दूध संघाची स्थावर ही स्वतःची असल्याप्रमाणे निर्णय घेणाऱ्या संचालकांना आवर घातला पाहिजे.

बचाव कृती समिती स्थापन झाल्यापासून भ्रष्ट कर्मचार्यांकडून ३६ लाखाची वसुली केली गेली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांना कृती समितीने पाठपुरावा करून बडतर्फ करायला लावलं.

त्यांच्यावर फौजदारी गुन्हा crime दाखल आहे. दुधाची बिल आता दर दहा दिवसाला दिली जातात. जिल्हा दूध संघाचे प्रशासकीय मंडळ हटवून खासगी प्रशासक नेमण्यात बचाव समितीने विरोध केला. तालुका संघ निर्मितीसही विरोध केला आहे असेही अनिल अवताडे म्हणाले. येत्या सोमवारी बचाव समितीचा पॅनल जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले जातील असेही सांगण्यात आलं. यावेळेस भाऊसाहेब धावणे, दत्‍तात्रय राजगुरू यांची उपस्थिती होती.

Tags: #District #MilkAssociation #election #announced #Rescue #Action #Committee #setup #panel#जिल्हा #दूधसंघ #निवडणूक #जाहीर #बचाव #कृतीसमिती #पॅनल
Previous Post

भारतीय जैन संघटनेचे कोविडमुक्त गाव अभियान, प्रथम बक्षीस 50 लाखांचं

Next Post

सरोगसीद्वारे बाळ, प्रियांका चोप्राचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सरोगसीद्वारे बाळ, प्रियांका चोप्राचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार

सरोगसीद्वारे बाळ, प्रियांका चोप्राचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार

Comments 2

  1. best spirograph sets says:
    7 months ago

    Hi there, thanks for the awesome posting. I’m having troubles subscribing to your blogs feed. Thought I’d let you know

  2. manekinyperuki says:
    5 months ago

    984880 428176Basically received my very first cavity. Rather devastating. I would like a super smile. Seeking a lot far more choices. A lot of thanks for the write-up 223042

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697