सोलापूर – शेतात पाखरे राखताना शेततळ्यात पडून सारिका ढेकळे आणि तिच्या दोन चिमुरडींचा अपघाती मृत्यू झाला नसून तिचा हुंड्यासाठी सासरी छळ केल्यामुळे तिने दोन्ही चिमुरडीसह शेततळ्यात उडी टाकून आत्महत्या sucide केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या पतीसह १० जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा crime दाखल झाला आहे.
त्यापैकी मयताचा पती, दीर आणि सासरे या तिघांना पोलिसांनी अटक arrested केली. त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत police custody ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी आर.ए. मिसाळ यांनी आज शनिवारी (ता. २२) दिला. ही घटना पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे काल शुक्रवारी Friday दुपारच्या सुमारास घडली होती .
आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे (वय २३) त्याचा भाऊ अण्णासाहेब ढेकळे (वय २६) आणि वडील उत्तम मच्छिंद्र ढेकळे (वय ५४ सर्व रा. पाथरी ता.उत्तर सोलापूर) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याशिवाय अनिता उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे (रा. पाथरी), विलास सुरवसे त्याची पत्नी सोजरबाई सुरवसे (रा.नंदगाव ता. तुळजापूर) साळूबाई बाळा गुंड, बाळा गुंड आणि छकुली (सर्व रा. पाथरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात मयत सारिका ढेकळे sarika यांची आई लक्ष्मीबाई व्यंकट सुरवसे (रा. नंदगाव ता. तुळजापूर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.९ मे २०१७ रोजी विवाह झाल्यानंतर आपली मुलगी सारिका ढेकळे हिला सासरकडील लोकांनी लग्नात मानपान, सोने दिले नाही म्हणून टोचून बोलणे, माहेरी न पाठवणे ,फोनवर बोलू न देणे,उपाशी ठेवणे तसेच दोन्ही मुलीच झाल्या म्हणून तिला मारहाण करून क्रूरपणाची वागणूक देत होते.
त्यांच्या मानपानच्या मागणीला कंटाळून आपली मुलगी सारीका हिने गुरुवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास दोन्ही मुलींसह आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने court आज दिला. या प्रकरणात आरोपी तर्फे एडवोकेट नवगिरे यांनी सरकारतर्फे बनसोडे यांनी काम पाहिले. पुढील तपास फौजदार दीपक दळवी हे करीत आहेत. Solapur: A case has been registered against 10 persons including her husband for drowning her mother and two daughters in a farm