पुणे : ज्येष्ठ उद्योगपती अरुण किर्लोस्कर (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. किर्लोस्कर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करत किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे अध्यक्षपद भूषविले होते. नंतरच्या काळात त्यांनी मोटारीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या ‘फिलड्रम’ आणि ‘फ्लिपगार्ड’ या कंपन्यांची स्थापना केली होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले होते. Industrialist Arun Kirloskar dies
मूळचे कोल्हापूर kolhapur येथील अरुण किर्लोस्कर यांचा जन्म १३ डिसेंबर १९३६ रोजी झाला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करत त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे अध्यक्षपद भूषविले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नंतरच्या काळात त्यांनी मोटारीच्या motar उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या ‘फिलड्रम’ आणि ‘फ्लिपगार्ड’ या कंपन्यांची स्थापना केली होती. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची सूत्रे मुलांच्या हाती सुपूर्द करून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले होते.
किर्लोस्कर यांनी ‘रामकृष्ण चॅरिटीज’च्या माध्यमातून वाईजवळील ग्रामीण भागात भारत विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना केली. त्यासाठी जमीन विकत घेऊन शाळा उभारली होती. ते स्वत: तेथे राहण्यासाठी गेले होते. साहित्याबद्दल त्यांना विशेष आवड असल्याने ‘अंतर्नाद’ या नियतकालिकासाठी शक्य ते सर्व सहकार्य आवर्जून करीत, असे भानू काळे यांनी नमूद केले.