By bending Malvika of Maharashtra
Sindhu wins 300th medal
नवी दिल्ली : पीव्ही सिंधूने आज रविवारी सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनलच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये मालविका बन्सोडला नमवून धडक कामगिरी केली. सिंधूने बाबू बनारसी दास इनडोअर स्टेडियमवर मालविकाचा ३५ मिनिटांत २१- १३, २१- १६ असा पराभव करून सुपर ३०० चे विजेतेपद पटकावले.
अवघ्या २० वर्षांच्या मराठमोळ्या मालविकाने स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे ‘फुलराणी’ म्हणून ओळख असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा खेळ पाहत मोठी झालेल्या मालविकानं इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या सायना नेहवालचा पराभव करत आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली होती.
भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत नागपूरची मराठमोळी खेळाडू मालविका बनसोडचा अवघ्या ३५ मिनिटांत एकतर्फी पराभव केला.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
PV Sindhu wins Syed Modi International tournament, defeats Malvika Bansod with 21-13, 21-16 in the final
(File pic) pic.twitter.com/hqjE9ewPx1
— ANI (@ANI) January 23, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने सरळ गेममध्ये २१-१३, २१-१६ असा विजय मिळवला. सिंधू दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन बनली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये तिने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
सिंधूने उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित रशियन प्रतिस्पर्धी इव्हगेनियाच्या रिटायर्ड हर्टनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याचवेळी मालविकाने उपांत्य फेरीत अनुपमा उपाध्यायचा १९-२१, २१-१९, २१-७असा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. करोनाच्या प्रकरणांमुळे, यावेळी अनेक अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महामारीमुळे २०२० आणि २०२१ मध्ये ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
सिंधू व्यतिरिक्त, इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीने रविवारी टी हेमा नागेंद्र बाबू आणि श्रीवेद गुराझादा यांचा सरळ गेममध्ये पराभव करून मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. इशान आणि तनिषाने अवघ्या २९ मिनिटांत बिगरमानांकित भारतीय जोडीविरुद्ध २१-१६, २१-१२असा विजय नोंदवला.