मुंबई : 25 वर्ष आम्ही युतीत सडलो असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी Shiv Sena chief Uddhav Thackeray म्हटलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ’25 वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण 2012 पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का?, असं फडणवीस म्हणाले.
भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे असं फडणवीस म्हणाले. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे. “माझा चेहरा वापरला असे महादेव जानकर आणि विनायक मेटेसुद्धा म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही चेहरा वापरला होता. त्यावेळी सगळे युतीमध्ये होते म्हणून सगळ्याचेच फोटो वापरले होते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तुमचे हिंदुत्व कागदावरचे आहे. हिंदुत्व बोलून चालत नाही, ते जगावे लागते. नरेंद्र मोदींनी narendra modi राम मंदिर ram mandhir, काशी विश्वनाथ, ३७० असे निर्णय घेतले. ३७० वर तुमची तर संदिग्ध भूमिका होती. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले, त्यापैकी १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. १९९६ साली २४ पैकी २३ जागी आणि २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणे त्यावेळी लाट होती, कशाला खोटे बोलता?,” असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
“आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत mumbai आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक election तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी manohar joshi जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,” अशी आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली. Fadnavis answers Uddhav Thackeray; Are you pointing fingers at Balasaheb’s decision?
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
हे भाजपासोबत सडले असं सांगातत. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष The fourth party झाले. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे,” असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला.
“आरएसएस RSS, धर्मवीर आनंद दिघेंनी संघर्ष केला. पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री CM होते तेव्हाही तुम्ही सोडवला नाही आणि आजही तुम्ही सोडवला नाही. त्यामुळे तुमचं हिंदुत्व कागदावरचं, भाषणातलं आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर Sambhajinagar of Aurangabad करु शकले नाही, उस्मानाबादचे धाराशीव Dharashiv of Osmanabad करु शकले नाही. पण तिथे अलाहाबादचं प्रयागराज Prayagraj of Allahabad झालं, त्यांनी ते करुन दाखवलं. तुम्ही फक्त बोलत राहिलात. हिंदुत्व जगावं लागतं, ते फक्त भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदींनी ते करुन दाखवलं आहे”.
आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना Venerable Balasaheb Thackeray अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून Sonia Gandhi, Rahul Gandhi and Priyanka Gandhi करुन दाखवा. याला लाचारी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते. तरी सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसता. यापेक्षा मोठी लाचारी काय?,” अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.