भंडारा : देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या medical students death कारचा अपघात झाला. वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा bhandara जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगदळे mla vijay Rahangdale यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे. विजय रहांगदळे यांचे सुपुत्र यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. यामुळे रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण 7 विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती first information आहे. भाजप आमदार विजय रहांगदळे हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. त्यांच्या मुलासह एकूण सात विद्यार्थी या भीषण अपघातात दगावले आहेत. इतर सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे.
देवळीहून वर्धेला येत असताना सेलसुराजवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला आहे. सेलसुराजवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
BJP MLA’s son killed in car accident, 7 students killed
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान आहे. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी राज्यात भीषण अपघातांची मालिका सुरु असून आतापर्यंत झालेल्या तीन अपघातात 15 जणांचा गेल्या 48 तासांत मृत्यू झाला आहे. तब्बल चार तास मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. कारमधील एकाचाही या अपघातात जीव वाचू शकलेला नाही. एकूण सात जण या अपघातात मृत्युमुखी पडलेत.
चारचाकी एक्सयुव्ही वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. कार नेमकी कोण चालवत होतं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा संपल्यामुळे पार्टी करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी गेले असल्याचं बोललं जातंय. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. कार थेट पुलावरुन खाली कोसळल्यानं या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.