यवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील वणी vani येथे एका कार्यक्रमात ऊर्जामंत्री नितीन राऊत Energy Minister Nitin Raut यांनी तत्कालीन सरसंघचालक Sarsanghchalak हेडगेवारांविषयी एक वक्तव्य one statement केले आहे. नाशिकमध्ये ब्रिटिशांकडून अटक होईल या भीतीपोटी सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती. तसेच ज्यांनी जातींमध्ये तंटे निर्माण केले तेच आपल्याला आज शहाणपण शिकवत आहेत, असे नितीन राऊत यांनी म्हंटले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक किस्सा A case from the pre-independence period सांगतिला.
वणी येथे काँग्रेस कार्यकर्ता पक्ष प्रवेश कार्यक्रम तसंच एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्तच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सरसंघचालक हेडगेवार नाशिकमध्ये मुक्कामी असताना त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती. ब्रिटिशांच्या भीतीने ही भेट नाकारल्याचंही राऊत म्हणाले आहेत.
तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार हे नाशिक nashik येथे मुक्कामी होते. यावेळी सुभाषचंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला त्यांच्याकडे पाठवले होते.
Hedgewar had refused to meet Subhash Chandra Bose for fear of arrest Nitin Raut Yavatmal
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक arrested करतील या भीतीने ही भेट नाकारली होती. असा दाखला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. तसंच आरएसएसनेच RSS जाती जातीत भांडण तंटे उभे केले असा आरोप करत, तेच लोकांना शिकवायला निघाले, या बद्दल चिंताही राऊत यांनी व्यक्त केली. ऊर्जामंत्री राऊत यांच्या या वक्तव्यांवरुन आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress State President Nana Patole यांनी ‘मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’ असे म्हटले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलेच वादंग निर्माण झाले. यावर भाजप नेते आक्रमक झाले. अटकेची मागणी केली. ठिकठिकाणी पटोलेंविरोधात आंदोलन करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मी गावातील एक मोदी नामक एका गुंडाबद्दल टिप्पणी केली असल्याचे म्हणत घूमजावच केला. यात आता मंत्री नितीन राऊत यांनी सरसंघचालक हेडगेवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आणखी वादंग वाढण्याची शक्यता आहे.
सरसंघचालक हेडगेवार यांनी १९३० मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह Jungle Satyagraha केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आता यात आता आगीत ठिणगी उठणार असल्याची चिन्हे आहेत.