बार्शी / सचिन आपसिंगकर : बार्शीत शेअर मार्केटच्या नावाखाली विशाल फटे या तरुणाने शेकडो नागरिकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी बार्शी न्यायालयाने विशालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वीही विशालला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विशालने 75 हून अधिक जणांची 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
बार्शीतील कोट्यावधी रुपयांच्या बहुचर्चित फसवणूक प्रकरणी आरोपी विशाल अंबादास फटे यास सत्र न्यायालयाने 2 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. अटक करताना त्याच्याकडे सापडलेले 1 लाख 68 हजार सोडले तर गेले आठ दिवस पोलिस कोठडीत असलेल्या फटेकडून अद्यापपर्यंत एक रुपयाही जप्त झालेला नाही. 105 तक्रारदारांचे सुमारे 22 कोटी कुठे गेले? याचा अजून पत्ता लागलेला नाही. विशालने गुंतवणूकदारांची शुध्द फसवणूक केली. शेअर बाजारात पैसे गुंतविण्याचा फक्त देखावा केला आणि गुंतवणूकदारांचा पैसा एकमेकांत फिरविला.
पोलिसांकडे हजर होण्यापूर्वी त्याने केलेल्या व्हिडीओतही तो चक्क खोटे बोलला. आणि आश्रू गाळून त्याने आपल्याविषयी लोकांमध्ये असलेला रोष कमी करुन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आता समोर येत आहे. फटे यास गेल्या 18 तारखेला दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली गेली होती. त्याच्या कोठडीची मुदत आणखी दोन दिवस बाकी असतानाच त्याच्याकडून काल जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या विश्लेषणासाठी वेळ लागणार असल्यामुळे पोलिसांनी त्यास आज मुदतपुर्व न्यायलयात हजर करुन पोलिस कोठडीचा आपला हक्क अबाधित राखून त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती न्यायलयास केली. न्यायलयाने ती मान्य करुन त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविले.
यावेळी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकिल प्रदीपसिंह राजपूत व आरोपींच्यावतीने ऍड. विशाल दीप बाबर हजर होते.
दरम्यान या प्रकरणात प्रारंभी वर्तविण्यात आलेला संशय खरा ठरला आहे. फटे याने जरी शेअर बाजारात पैसे गुंतवून त्यावर भरमसाठ नफा कमवून पैसे दुप्पट, तिप्पट करण्याचे आमिष दाखविलेले असले आणि शेअर बाजाराचा सगळा सेटअप, प्रशिक्षण, पुरस्कार असा देखावा The whole stock market setup, training, rewards look उभा केला असला तरी प्रत्यक्षात गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे शेअर बाजारात गुंतविलेच गेले नाहीत. हे पैसे गुंतवणूकदारांतच फिरवले गेले. नवीन ग्राहकाकडून आलेले पैसे जुन्या ग्राहकाला नफा म्हणून द्यायचे आणि त्याला पुन्हा गुंतवणूक करण्यास उद्युक्त करुन तेच पैसे परत घ्यायचे.
जो गुंतवणूकदार नेटाने सगळे पैसे परत मागेल, त्याला नवीन गुंतवणूकदाराकडून आलेले पैसे द्यायचे आणि वाढीव आमिष दाखवून आणखी नवीन गुंतवणूकदार शोधायचे, असाच सगळा खेळ चालला हेाता. या खेळाच्या केंद्रस्थानी फटे असला तरी केवळ फटे यानेच नव्हे तर त्याच्या या खेळात आजूबाजूच्यांनीही हात धुवून घेतला आहे.
Huge torn courtroom; Pure investor fraud, Just the appearance of investing money in the stock market
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आपल्या शेअर बाजाराच्या गप्पांना लोक भुलतात म्हटल्यावर फटेला पैशाची चटकच लागली. लोकांमध्ये शेअर बाजाराबाबत असलेले अज्ञानही त्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे बीएसई BSE आणि एनएसई NSE बाजार डिस्पलेही desply तो काही ग्राहकांनी आपल्या पैशाची उलाढाल म्हणून दाखवत राहिला आणि आपल्या रुबाबाला लोक कसे फसतात म्हणून गालातल्या गालात हसत राहिला.
स्वीकारत गेलेल्या पैशाचा ओघ कायम राहण्यासाठी त्याला रिटर्न मनी returns money चा दर सतत वाढता ठेवावा लागला. त्यामुळे सुरुवातीला दहा टक्के रिटर्नचे आमिष शेवटी साठपटीवर गेले. आलेल्या पैशातून ऐषोआरामासाठी मोठा पैसा खर्च झाला. येणार्या पैशापेक्षा द्यायच्या पैशाचा डोंगर वाढत गेला. शेवटी यातून बाहेर पडण्यासाठी 10 लाखाचे वर्षात 6 कोटी करण्याची ऑफर आणली. त्यातूनही वाढलेला गुंता सोडविता आला नाही. त्यामुळे शेवटी पलायन करावे लागले.
पलायन करताना फक्त आपल्यावरच सगळा दोष येईल, असा कयास होता. मात्र कुटुंबिय तुरुंगात गेल्यानंतर जास्त दिवस लपून राहता आले नाही. त्यातून गुंतवणूकदारांचा रोष कमी करण्यासाठी, सहानुभूती मिळविण्यासाठी पुन्हा आणखी शेअर बाजाराचेच तुणतुणे वाजविले. डोळ्यात अश्रू आणले. खोट्या बाता मारल्या. पुन्हा लोक भुलले. मग पोलिसांत हजर झाला. मुख्य आरोपी हजर झाल्यामुळे कुटुंबातले इतर सदस्य निश्चिंत झाले. त्यातच पोलिसांनी दुसर्या क्रमांकाची आरोपी असलेली पत्नी आरोपीच नसल्याचे जाहीर करुन टाकले. त्यामुळे तर सगळा आनंदीआनंदच झाला.
अजूनही ज्यांना आपल्या पैशाचा स्त्रोत दाखवता येत आहे, तेच गुंतवणूकदार पोलिसांकडे जात आहेत. ज्यांचा पैसा बेहिशोबी आहे. ते गप्पच आहेत. त्यामुळे रेकॉर्डवर येईल, तेवढ्याच पैशासाठी आपल्याला जबाबदार धरले जाईल, हे फटे जाणून आहे. त्याची सगळी संपत्ती विकली तरी त्यातील दहा टक्के पैशाचीही परतफेड होणार नाही. काही गुंतवणूकदार ठणाणा करतील, पण त्यांची गुंतवणूकच कायदेशीर नसल्यामुळे आणि त्यांनी फटे बरोबर केलेले स्टँम्प करार नोंदणीकृत Registered stamp agreement नसल्यामुळे त्यांना कोणी वालीच नाही.
तसा फटेने स्वत: वाटाघाटी करुन गुंतवणूकदारांकडून घेतलेला पैसा कमी आहे. त्याच्या सहकार्यांनी भुलवून आणलेल्या गुंतवणूकदारांचा आकडा मोठा आहे. मात्र आता हेच सहकारी फटेकडे हात दाखवून मोकळे होत आहेत. गुंतवणूकदार अजून त्यांचा खरा चेहरा ओळखू शकले नाहीत. हेच त्यांचे दुर्देव आहे.