मुस्लिम समाज फुलारेंना विसरणार नाही, शहर काझी यांचे गौरवोद्गार
सोलापूर : लाखो रुपयांचा निधी खर्च करून मोदी मुस्लिम कब्रिस्थानाचा नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलेला विकास मुस्लिम समाज कधीच विसरणार नाही , कायमच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं प्रतिपादन शहर काझी सय्यद अमजद अली काझी यांनी केलं
आपल्या भांडवली निधीतून तब्बल 86 लाख रुपये खर्च करून प्रभाग 15 च्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मोदी मुस्लिम कब्रिस्थानचा नियोजनबद्ध असा विकास साधताना भव्य प्रवेशद्वार उभारलं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिसरात पेव्हर ब्लॉक टाकण्यात येउन चांगला रस्ता करण्यात आला आहे. एल ई डी लाईटच्या माध्यमातून एक चांगली सोय केली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना हात पाय धुण्यासाठी पाण्याची सुविधा आहे तर स्मशानभूमीतील अंतर्गत रस्त्यांची देखील सुधारणा करण्यात आली आहे. नमाज पठणाच्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. थोडक्यात या परिसरात आमूलाग्र बदल घडवण्यात आला आहे.
या विकास कामांचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताकदिनी शहर काझींच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सय्यद अमजद अली काझी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीकांचना यन्नम होत्या तर माजी महापौर ऍड यु एन बेरिया,आरिफ शेख, नगरसेवक तौफिक शेख, तौफिक हत्तूरे, नगरसेविका परवीन ईनामदार ,नगरसेविका तस्लिमा शेख , नगरसेविका साज़िया शेख, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, एआयएमचे शहर अध्यक्ष फारुक शाब्दी, शौकत पठाण, समाजसेवक जॉन फुलारे, जमीर शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील इमाम यांची उपस्थिती होती
प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आपलं मनोगत व्यक्त करताना नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मोदी मुस्लिम कब्रिस्थान इथल्या समस्या आपण पाहिल्या मुख्य म्हणजे इतक्या मोठ्या स्मशानभूमीला गेट देखील न्हवतं अन्य समस्या गंभीर होत्या आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. आज इथं मोठा विकास आपल्या हातून घडलाय याचं समाधान काही वेगळंच असल्याची भावना व्यक्त करताना मुस्लिम समाजाचं आपल्याला कायमच सहकार्य लाभल्याचं देखील त्या म्हणाल्या.
Transformed Muslim cemetery at a cost of Rs. 86 lakhs
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
माजी महापौर ऍड यु एन बेरिया तसच आरिफ शेख यांनी श्रीदेवी फुलारे यांच्या कार्यपद्धतीच कौतुक केलं एम आय एम चे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी श्रीदेवी फुलारे यांचं मुस्लिम समाज तसच इतर घटकांसाठी जे कार्य झालंय त्याचं आपणास निश्चितच कौतुक असून अशा लोकप्रतिनिधींची समाजाला खरी गरज आहे आपण स्वतः त्यांच्या प्रचारासाठी जाऊ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या
समाजसेवक जॉन फुलारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रभागात विकासाची कामं झाली मात्र मोदी मुस्लिम कब्रिस्थानाचा विकास आपण मोठं यश मानत असल्याचे म्हटले. इथे सर्व त्या सुविधा निर्माण करून देताना आपण बारकाईने लक्ष ठेऊन होतो सोलापुरात अशी स्मशानभूमी असेल अशी कल्पनाही कोणी करणार नाही , असा विश्वास व्यक्त करताना इथेच लहानपणी आपण कष्ट सोसले आणि इथला विकास करण्याची संधी मिळाली ही त्या ईश्वराची आपण देणगीच समजतो,असं म्हटले.
महापौर श्रीकांचना यन्नम यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे या नेहमीच विकास कामाच्या बाबतीत अग्रेसर राहिल्या आहेत आणि मोदी मुस्लिम कब्रिस्थानाचा त्यांनी साधलेला विकास ही मोठी बाब म्हणावी लागते अशा शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं
आपल्या प्रमुख विचारात शहर काझी सय्यद अमजद अली काझी यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी कायमच जाती पातीच्या पलीकडे जाऊन काम केलं आहे मोदी मुस्लिम कब्रस्थानाचा त्यांनी साधलेला विकास त्यांच्या कामाची धमक दाखवून देत असल्याचे म्हटले.
यावेळी ईफ्तेकार तुळजापुरे, मतीन बागवान,फारुख शेख,सिज्जू पैलवान,आबादीराजे,एजाज पटेल,फैज अहमद कानकुर्ती, आझम शेख, अजमल शेख, जब्बार मुर्षद, नजीब शेख, खलिल कादरी आदींसह , रजीया शेख, मुस्लिम समाजाच्या महिला नासिमा कुरेशी , अनिसा डोका , सलमा सायद्द , यस्मिन पठान, मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन हाफिज इम्रान बागवान यांनी केले.