बंगळूरू : कर्नाटकातील शाळा- कॉलेज मध्ये हिजाब वरुन झालेल्या तणावानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-कॉलेज आजपासून 3 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही ट्विट करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा-महाविद्यालयांचे व्यवस्थापन तसेच कर्नाटकातील जनतेला शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतो, असे ते म्हणाले.
शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू झालेला वाद कर्नाटकात आता सर्वदूर पसरला आहे आणि चांगलाच चिघळला आहे. रस्त्यावरून हिजाब घालून जाणाऱ्या विद्यार्थिनीला जय श्रीराम असं म्हणत काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आव्हान दिली. तिनेही त्यावर अल्लाहू अकबरचा नारा देत उत्तर दिलं. हे असे काही video सोशल मीडियावर viral झाल्यानंतर आता कर्नाटकातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने पुढचे 3 दिवस माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे.
एका बाजूला, भगव्या शाली, उपरणी आणि झेंडे नाचवणारी तरुण आणि दुसऱ्या बाजूला त्यांना विरोध करणाऱ्या हिजाबधारी तरुणी असं तणावग्रस्त चित्र एका तून समोर आलं. शिवमोगा जिल्ह्यातल्या सागरा कॉलेज कॅम्पसमधली ही दृश्य असल्याचं समजतं. हे अशांततेचं लोण राज्यभर पसरलं आहे. दावणगिरीतल्या हरिहरा इथे हिजाबविरोधी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्याचाही video समोर आला आहे. Dispute erupts in Karnataka, school-college closed for 3 days; Priyanka Gandhi’s jump
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आता ही सगळी दृश्य सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागल्याने प्रशासनाने सावध भूमिका घेत शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक आणि जनतेने शांतता राखावी, सौहार्द टिकवून ठेवावं,” असं आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात हिजाबवरुन राजकीय वातावरण चांगलाच वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे प्रकरण इतकं तापलं कि हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे.
कर्नाटकातील विद्यार्थीनींना हिजाब परिधान करुन महाविद्यालयात प्रवेश नाकारला. त्यानंतर हा वाद सुरू झाला. या प्रकरणी काही मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात आवाज उठवला. एकीकडे या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम मुली आक्रमक झाल्या आहेत तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना, विद्यार्थी भगवा गमचा परिधान करुन आपला विरोध दर्शवत आहेत.
□ बिकिनी, घुंघट, नाहीतर हिजाब ! काय परिधान करायचे हा महिलांचा अधिकार
– कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद सुरू आहे. त्यावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिकीनी, घुंघट, जिन्स किंवा हिजाब काहीही असो, काय परिधान करायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘महिलांना भारतीय राज्यघटनेने हा अधिकार दिला आहे, महिलांना त्रास देणे थांबवा,’ असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले.