मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणी सध्या ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. याप्रकरणातील आणखी एक आरोपी सचिन वाझेने महत्त्वाचा खुलासा केला आहे. अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून आपण बारमधून वसुली केली आणि वसुली केलेले पैसे त्यांच्या लोकांना दिल्याचा खुलासा वाझेने केला. दरम्यान, यामुळे आता अनिल देशमुखांचे संकट आणखी वाढले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात ईडीला सचिन वाझेने लेखी पत्र पाठवले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे यांनी ईडीला पत्र लिहित माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचे पत्र लिहिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात सरकारी साक्षीदार बनण्यास आपण तयार असल्याचे सचिन वाझे यांनी लेखी पत्रात म्हटले आहे.
सचिन वाझे यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक संचालक तसीन सुलतान यांना पत्र लिहून अनिल देशमुख व इतरांविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात वाझे यांच्यावरही आरोप करण्यात आले असून, ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दोनदा त्यांचा जबाब नोंदवला आहे. सचिन वाझे यांनी हे पत्र ४ फेब्रुवारी रोजी लिहिले असून तळोजा कारागृहातून पोस्टाने पाठवण्यात आले होते.
वाझेंच्या या अर्जसंदर्भात ईडी 14 फेब्रुवारीला न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख निलंबित आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चांदीवाल आयोगाची स्थापना या आरोपांच्या चौकशीसाठी करण्यात आली होती. सचिन वाझेनी त्यावेळी अनिल देशुमख यांना उलट तपासणीसाठी क्लीन चीट दिली होती. At the behest of Anil Deshmukh, I recovered Sachin Waze; Trouble even after resignation
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पण, आता आपल्या जबाबात सचिन वाझेने बदल करण्याचा अर्ज केले होते. आयोगाने सचिन वाझेचा हा अर्ज फेटाळून लावला आहे. आयोगाने त्यावेळी वाझेना तुम्हाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे द्यावे लागले होते का? असा प्रश्न विचारला होता. वाझेनी या प्रश्नावर ‘नाही’ असे उत्तर दिले होते. पण, त्यांनी आता न्यायालयाकडे केलेल्या अर्जात ‘हो’ असा बदल करण्याची विनंती केली आहे.
अनिल देशमुख यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने तुमच्याकडे कधीही पैशांची मागणी केली नसल्याचे म्हणणे योग्य ठरेल का? असा प्रश्न आयोगाने विचारला होता. वाझेचे त्यावेळी उत्तर नाही होते. परंतु, आता त्यांना या जबाबामध्ये बदल करायचा आहे. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक त्यांच्या वतीने माझ्याकडे पैसे मागायचे. मला अनिल देशमुख आणि त्यांच्या लोकांकडून पैसे घेण्यास सांगितले गेले, असे वाझेने अर्जात नमूद केले आहे.
या दोन प्रश्नात सचिन वाझेला बदल करायचा आहे, कारण या प्रश्नांची उत्तरे आधी त्याने दबावाखाली दिली होती. तसेच माझा अनिल देशमुख यांनी मानसिक छळ केला. राजीनामा दिल्यानंतरही मला त्रास देत होते. यासर्व कारणांमुळेच त्यांनी पोलीस कोठडीला कोणताही विरोध केला नसल्याचे म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता. अनिल देशमुख हे नेहमी माझी काळजी घेतील आणि मला सुरक्षित ठेवतील, असे मला वाटत होते, असेही वाझेने म्हटले आहे.
देशमुखांचा आजही माझ्या आयुष्यावर, माझ्या भविष्यावर आणि माझ्या आजूबाजुला घडणाऱ्या किंवा माझ्याशी संबंधित घटनांवर प्रभाव झाला. मुंबई पोलीस आयुक्तांनी 22 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्या तीन चुलत भावांना निलंबित केले. आपल्यावर कशाप्रकारचा दबाब आणला जातो, हे यावरून स्पष्ट होत असल्याचेही सचिन वाझेने म्हटले आहे.