अहमदनगर : पंतप्रधान मोदींनी जनधन खात्यावर 15 लाख जमा करण्याची घोषणा केली होती. परंतु तसे झाले नाही. त्यातच आता औरंगाबादमधील एका शेतकऱ्याच्या खात्यात खरोखर 15 लाख रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्ञानेश्वर औटी असं त्याचं नाव आहे. तसेच या शेतकऱ्याने काही रक्कम काढून स्वतःसाठी घर सुद्धा बांधून घेतले. परंतु नंतर वेगळाच प्रकार समोर आला. बँक प्रशासनाच्या एका चुकीने हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर आले.
अनेकदा तांत्रिक गडबडीमुळे किंवा मानवी चुकांमुळे अशा प्रकारे खात्यात अचानक मोठी रक्कम जमा होऊ शकते. पण, ते खात्यात जमा झाले म्हणून खातेदाराचे पैसे नसतात. अशा प्रकारे जर चुकून पैसे जमा झाले तर त्वरित संबंधित बँकेच्या शाखेत जावून तक्रार करा. जुनी देणी, कोणत्याही ठेवींची मुदत संपणे किंवा अन्यत्र कोणत्याही मार्गाने तुम्हाला पैसे जमा होणार आहेत का याची आधी खात्री करा. जर असे कोणतेही पैसे जमा होणार नसतील. तर तुमच्या खात्यात चुकून ही रक्कम जमा झाली आहे, असा त्याचा निष्कर्ष होतो. हे पैसे परस्पर काढून खर्च केल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. असच पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथील आहे. ज्ञानेश्वर जनार्धन औटे नावाचा शेतकरी कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.
कधी कधी बँकेच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक कारणाने अशी रक्कम जमा होते. पण, बँकेच्या नित्य व्यवहारांमध्ये ती बाब लपून राहत नाही आणि बँक थोड्याच वेळात ती रक्कम मूळ जागी परत पाठवते. पण, त्या वेळात जर तुम्ही ती रक्कम खर्च केलीत किंवा काढलीत तर तुमच्याकडून ती परत मागण्याचा कायदेशीर अधिकार बँकेकडे असतो. काही काळापूर्वी एका व्यक्तीला त्यांच्या जनधन खात्यात अचानक 15 लाख रुपये जमा झाल्याचं आढळलं. 15 lakh was deposited in the Jandhan account of the farmer and the expenses were incurred but he got stuck in the legal dilemma
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
2014 मधील भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील 15 लाख रुपयांचा उल्लेख होता. खात्यात आलेली रक्कम हे तेच 15 लाख असावेत असा त्यांचा समज झाला. त्यांनी खात्यातून 9 लाख रुपये काढले आणि घर बांधण्याच्या कामात खर्च केले. आता बँक त्यांच्याकडे ही रक्कम परत मागत आहे.
यातील 9 लाख रूपये काढत त्याने त्याचे घर बांधले. तब्बल ४ महिन्यांनंतर ही चूक ग्रामपंचायतीच्या लक्षात आली असून आता पिंपळवाडी ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला आहे. पैसे आपल्याला मिळाल्याचे वाटल्यानेच आपण ते खर्च केले, आता उरलेले 6 लाख व खर्च केलेली रक्कम आपण बँकेला व ग्रामपंचायतीला हप्त्या-हप्त्याने परत करू असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
हा विषय सध्या पैठणमध्ये चर्चेचा ठरला आहे. आता ज्ञानेश्वर यांना ग्रामपंचायतीने पैसे परत करण्याचे पत्र पाठवले असून यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पैसे मी देईल परंतु आता सध्या हे पैसे माझ्याकडे नाहीत. मी टप्प्याटप्प्याने पैसे देईल असे त्याने म्हटले आहे. कारण सदर शेतकऱ्याने यातील बरीच रक्कम घरकाम अन इतर कारणासाठी खर्च केली आहे.
आता ही एवढी रक्कम कशी द्यावी असा प्रश्नही त्याच्यापुढे पडला आहे.